Dhanteras 2023 (PC - File Image)

Dhanteras 2023: धनत्रयोदशी (Dhantrayodashi) हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशीचा सण 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी परंपरेने लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात. तसेच धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी या दिवशी घरांमध्ये विशेष पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी लोक विशेषत: सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती किंवा इतर वस्तू खरेदी करतात, कारण ते धनवृद्धीसाठी शुभ मानले जाते. या दिवशी खरेदीला खूप महत्त्व असले तरी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू नये अशा काही गोष्टी धर्मग्रंथांमध्ये सांगण्यात आल्या आहेत. या कोणत्या वस्तू आहेत, जाणून घेऊयात...(हेही वाचा - Dhanteras 2023 Shubh Muhurat: दिवाळी निमित्त शॉपींग करताय? जाणून घ्या धनत्रयोदशी खरेदी मुहूर्त)

लोखंड

धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू घरी आणणे शुभ मानले जात नाही. ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडापासून बनवलेली कोणतीही वस्तू घरात आणल्यास घरामध्ये अशुभ ठरू शकतं. याचा शुभ परिणाम मिळत नाहीत.

अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू -

धनत्रयोदशीला अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करू नका. असे मानले जाते की स्टील किंवा अॅल्युमिनियमची बनलेली भांडी किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि घरामध्ये गरिबी वास करते.

प्लास्टिक -

धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही प्लास्टिकची कोणतीही वस्तू घरी आणल्यास, यामुळे तुमच्या संपत्तीची स्थिरता कमी होऊ शकते.

काचेच्या वस्तू -

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर काचेच्या वस्तू अजिबात खरेदी करू नयेत. आरसा किंवा काच याचा थेट संबंध राहुशी असतो. राहू घरामध्ये प्रवेश केल्यास प्रगती थांबते असे मानले जाते.

चिनी मातीच्या वस्तू -

ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी कोणीही चिनी मातीपासून बनलेल्या वस्तू खरेदी करू नयेत.

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. LatestLY मराठी त्याची पुष्टी करत नाही.