Diwali 2020 (Photo Credits: Unsplash)

दिवाळी (Diwali 2020) हा दिव्यांचा सण आहे. यानिमित्ताने सर्वत्र सजावट पाहायला मिळते. लोक आपली घरे सजवतात, उत्तम कपडे घालतात, फटाके, दिवे, फराळ, पूजा अशा सानिध्यात हा सण साजरा केला जातो. दिवाळीत फोटो क्लिक करण्यालाही विशेष महत्व आहे. या सणाच्या काळात लोक विविध प्रकारे फोटो क्लिक करून ते सोशल मिडियावर पोस्ट करतात. त्यामुळे तुमची दिवाळी आणखी खास करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही फोटोग्राफी टिप्संबद्दल (Photography Tips) सांगत आहोत. या टिप्स स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी खूप उपयुक्त ठरतील. त्यांच्या मदतीने आपण उत्तम फोटो काढू शकाल व ते क्षण आयुष्यभर जपून ठेऊ शकाल.

> एखाद्या गोष्टीचा फोटो क्लिक करताना जास्त झूम (Zoom) करु नका. असे केल्याने, फोटोचे रिझोल्यूशन बिघडते आणि फोटोच्या क्वालिटीवर परिणाम होतो.

> आपण दिव्यांचा फोटो घेऊ इच्छित असल्यास, तो आपण ट्रायपॉड किंवा सेल्फ-टाइमर फिचरचा वापर करून घ्या. यामुळे कॅमेरा जास्त हलणार नाही.

> फोटो क्लिक करताना नाईट मोड वापरल्यास आपला फोटो बर्‍यापैकी चांगला होईल.

> अधिक स्पष्ट आणि क्रिस्प फोटोसाठी तुम्ही स्वतः एक्स्पोजर मॅन्युअली कमी करू शकता.

> दिवाळीचे फोटो वॉर्म असल्यास ते चांगले दिसतात. यासाठी आपण मॅन्युअल किंवा प्रो मोड वापरू शकता. यामुळे कलर टेम्परेचर आणि एक्सपोजर नियंत्रित केले जाऊ शकते.

> आपल्याकडे एका मोठ्या जागेचा फोटो काढायचा असेल तर, लँडस्केप मोड हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

> कँडीड शॉट किंवा सेल्फीसाठी पोर्ट्रेट मोड आणि बॅकग्राउंड बोके इफेक्शनद्वारे चांगले फोटो घेतले जाऊ शकतात. (हेही वाचा: यंदा भाऊबीजेला आपल्या लाडक्या भावासाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स)

> फटाके वाजवतानाचे फोटो क्लिक करताना ऑटो टायमर फंक्शनेल्टी वापरणे अधिक चांगले होईल. त्याच्या मदतीने, हात शेक न होता फोटो क्लिक करण्यासाठी मदत मिळेल. हे फिचर वापरुन तुम्ही ग्रुप फोटो आणि फॅमिली फोटो क्लिक करू शकता.

> तसेच फटाके कॅप्चर करताना स्लो-मो मोड वापरा, यामुळे हे फोटो अतिशय युनिक दिसतील.

> दिवाळीचे फोटो क्लिक करताना बॅकग्राउंड वर लाईटसारखे काही प्रॉप्स वापरा, ज्यामुळे तुमच्या फोटोंना एक फेस्टीव्ह लूक मिळेल.