दिवाळीमधील (Diwali 2020) 5 दिवस हे आपापल्या परीने खास आहेत. दिवाळीदरम्यानचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे अश्विनातील अमावस्या. या दिवशी मोठ्या थाटामाटात लक्ष्मीपूजन केले जाते. त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा, म्हणजेच दिवाळी पाडवा (Diwali Padwa) हा दिवस साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस हिंदू धर्मियांसाठी अतिशय शुभ मानला आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. याच दिवशी पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. खरेदीसाठी मुख्यत्वे सोने, नवीन गाड्या ई. दिवाळी पाडव्याचा सण महत्वाचा समजला जातो.
अत्यंत दानशूर असलेल्या, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला याच दिवशी भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडले होते. श्रीविष्णूने कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते. तर अशा या शुभदिनी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून साजरा करा दिवाळी पाडव्याचा सण.
दरम्यान, बळी राजाकडून दान घेण्यासाठी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने, बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते.
(हेही वाचा: Easy Rangoli Design for Diwali 2020: दिवाळीसाठी खास सोप्पी आणि सुंदर रांगोळी काढून साजरा करा दीपोत्सव!)
या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करावी. जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करून बळीला नैवेद्य दाखवावा.