Diwali Padwa 2020 Gift Ideas for Husband: (Photo Credits: PixaBay)

Diwali Padwa 2020 Gift Ideas: कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा (Diwali Padwa) हा सण साजरा केला जातो. या दिवसाला बलिप्रतिपदा (Balipratipada) असेही म्हणतात. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळल्यावर पती तिच्या ओवाळणीत सुंदर भेट देतो. ही परंपरा फार पूर्वापार चालत आली आहे. नवविवाहित दाम्पत्यांसाठी तर लग्नानंतरचा पहिला पाडवा खूपच खास असतो. या दिवशी न केवळ पती पत्नी, तर त्यांची घरची मंडळी देखील त्यांना भेटवस्तू देतात. प्रत्येक जोडपं या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपला पती (Husband) वा आपली पत्नी (Wife) आपल्याला काय गिफ्ट याची सर्वांना उत्सुकता लागलेली असते. यात पत्नीसाठी ते पतीदेवांकडे बरेच पर्याय असतात. मात्र पतीसाठी काय घ्यायचे हा मोठा पेच पत्नीपुढे असतो.

यासाठी पतीराजांना आठवणीत राहिल अशी काहीतरी चांगली वस्तू त्यांना भेट म्हणून देण्याकडे पत्नीचा कल असला पाहिजे. आपल्या पतीला काय आवडते वा आवडेल ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याव्यतिरिक्त काही भन्नाट गिफ्ट आयडियाज देण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. हेदेखील वाचा- Diwali Padwa 2020: दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा यंदा कधी? जाणून घ्या दीपोत्सवातील या दिवसाचं महत्त्व

1. आवडीचा पदार्थ बनवणे

असं म्हणतात पुरुषाचे मनं जिंकायचे असेल तर त्याचा मार्ग हा पोटातून असतो. त्यामुळे पतीला आवडणारा एखादा चांगला पदार्थ त्यांच्यासाठी बनवा.

2. पतीच्या नावाचा टॅटू काढू शकता

जर तुमच्या पतीला टॅटू हा प्रकार आवडत असेल तर तुम्ही तुमच्या हातावर पतीच्या नावाच्या टॅटू काढून त्यांना छान सरप्राईज देऊ शकता.

3. पती फिटनेस फ्रिक असल्यास त्याला स्मार्टबँड वा फिटनेसशी संबंधित गिफ्ट द्या

जर पतीला व्यायामाची आवड असेल तर त्याला जिमशी संबधित स्मार्टबँड, शूज, जिम बॅग यांसारखे गिफ्ट्स द्या.

4. सोन्याची आवड असेल तर काहीतरी छान दागिना द्या.

यात तुम्ही पतीला सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठी, लॉकेट यांसारखा एखादा दागिना भेट म्हणून देऊ शकता.

5. वॉलेट, गॉगल्स या अॅक्सेसरिज व्यतिरिक्त तुम्ही छान गॅजेट्सशी देऊ शकता

तुमच्या पतीला गॅजेट्सचे वेडं असेल तर तुम्ही मोबाईल, स्पीकर्स, हेडफोन्स यांसारखे गिफ्ट्स देऊ शकता. त्यासोबत गॉगल, वॉलेट, टाय, यांसारख्या अॅक्सेसरिजही देऊ शकता.

बदलत्या काळानुसार तुम्हीही तुमच्या पतीला काही अँटिक गिफ्ट देऊन आश्चर्यचकित करु शकता. या गिफ्टमध्ये तुम्ही टूरचे तिकिट्सही देऊ शकता. पण कोरोना व्हायरसमुळे आम्ही यंदा तुम्हाला हा सल्ला देणार नाही.