दिवाळीच्या सणादरम्यान येणाऱ्या धनतेरच्या दिवशी खरेदी करण्याचे एक खास महत्व आहे. या दिवशी प्रत्येकजण बाजारात जाऊन एखादी नवी वस्तू खरेदी करतो. त्यामुळे घरात नेहमीच समृद्धी कायम राहते असे मानले जाते. धनतेरसला केलेली खरेदीच्या दिवसाला महादिन सुद्धा म्हटले जाते. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष संपन्नता नेहमीच राहते असे म्हणतात.
पण तुम्हाला माहिती आहे का धनतेसरच्या दिवशी काय खरेदी काय करावे आणि काय नाही. परंतु धनतेरच्या दिवशी या काही गोष्टी खरेदी करु नका. त्यामुळे काही गोष्टी धनतेरसच्या दिवशी खरेदी केल्यास सौभाग्या ऐवजी विवाहित महिलांना दुर्भाग्य लाभल्याचे मानले जाते.(Dhanteras 2019 Puja Vidhi: धनत्रयोदशी दिवशी कुबेर आणि धन्वंतरी पूजन करण्याचे महत्त्व, पुजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या)
धनतेरच्या दिवसी घरात लोखंडाची कोणती ही वस्तू घरी आणू नका. परंतु जर तुम्हाला लोखंडाची भांडी खरेदी करायची असल्यास ती धनतेरच्या पूर्वी खरेदी करा.
>>स्टीलच्या वस्तू सुद्धा खरेदी करु नका. कारण स्टील हे लोखंडाचे दुसरे रुप आहे. त्यामुळे स्टील ऐवजी कॉपर किंवा ब्रॉन्जची भांडी खरेदी करा.
>>काळ्या रंगाची कोणतेही वस्तू खरेदी करु नका. धनतेरस हा शुभ दिवस असून काळा रंग हा नेहमी दुर्भाग्याचे प्रतीक मानले जाते.
>> या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु चुकून सुद्धा खोटी सोन्याची ज्वेलरी किंवा नाणी घरात आणू नका.
>>काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळा. कारण काचेचा संबंध राहु सोबत जोडला गेल्याने ते खरेदी करु नका. तसेच या दिवशी काचेच्या कोणत्याही वस्तूचा वापर करण्यापासून दूर राहावे.
धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देव धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो. या देवाची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेच लोकांचे असे मानणे आहे की, याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.