Dhamma Chakra Pravartan Din 2020: नागपूरच्या दीक्षाभूमीवरील यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सामुहिक कार्यक्रम रद्द; भीम अनुयायींना घरात राहूनच अभिवादन करण्याचं आवाहन
Dhammachkra Pravartan Din (Photo Credits: File Image)

भारतामध्ये यंदा सार्‍याचं सणांवर कोरोनाचं सावट आहे. बौद्ध धर्मीयांसाठी खास असलेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा (Dhamma Chakra Pravartan Din) सामुहिक कार्यक्रम देखील कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे रद्द झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा नगपूरच्या दीक्षाभूमीवर भीम अनुयायींचा जथा दिसणार नाही. यंदाच्या वर्षी सार्‍या भीम अनुयायींनी घरामध्येच राहूना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपला आदरभाव व्यक्त करायचा आहे असे आवाहन करण्यात आले आहे. 14 ऑक्टोबर दिवशी हा धम्मचक्र प्रवर्तन दिन तारखेप्रमाणे तर तिथी प्रमाणे विजयादशमीच्या दिवशी साजरा होतो. दसर्‍याच्या सण (Dussehra) 25 ऑक्टोबरला असला तरीही या सणादिवशी साजरा होणार बौद्ध धर्मीयांचा धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा रद्द करण्यात आला आहे. Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा, WhatsApp Status, SMS, Wishes, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन साजरा करा आजचा दिवस.

 

दीक्षाभूमीवर यंदा कार्यक्रम साजरा करण्यासाठी परवानगी दिली जावी यासाठी काहीजण कोर्टात देखील गेले होते. मात्र कोर्टाने याचिकेवर सुनावणी करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (Dr Babasaheb Ambedkar Smarak Samiti)ही खाजगी ट्रस्ट आहे. त्यामुळे त्यांना सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही असे सांगितले आहे. त्यामुळे कोर्टाचा मान राखत सार्वजनिक स्वरूपात थाटात यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जाणार नाही.

अत्यंत साधेपणाने समितीमधील काही मंडळी यंदा रीती-रिवाज पूर्ण करतील. त्यामध्ये समता सैनिक दल 24 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता मानवंदना देतील. तर बुद्ध वंदना आणि भीम वंदना 25 ऑक्टोबरच्या सकाळी 8.30 वाजता दिली जाईल. या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग YouTube channel , UCN Buddha आणि Aawaz India या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून पोहचवले जाईल.

कोविड 19 ची स्थिती पाहता मागील 6-7 महिन्यात सेवा करताना ज्यांना मरण आले अशा कोविड योद्धांसाठी देखील विशेष प्रार्थना कार्यक्रम यंदा आयोजित केला आहे.