Mumba Devi Temple in Mumbai (Photo Credits: ANI)

आजपासून (17 ऑक्टोबर, शनिवार) नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे देशभरातील मंदिरांमध्ये सकाळपासूनच पूजेची लगबग सुरु झाली आहे. यापुढील नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाईल. आदिशक्तीचा जागर केला जाईल. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. यावर्षीही कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरातील अनेक मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मात्र अद्याप महाराष्ट्रात मंदिरं खुली न झाल्याने मुंबईकरांनी बाहेरुनच मुंबाईदेवीचे दर्शन घेतले आहे. देशभरातील विविध मंदिरातील दृश्यं समोर आली आहेत. (घटस्थापना निमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करुन साजरा नवरात्रोत्सव!)

पहा फोटोज:

मुंबईतील ंमुंबादेवीचे  बाहेरुनच दर्शन घेताना भाविक.

कोविड-19 लॉकडाऊननंतर केरळ मधील शबरीमला मंदिर आज भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. दरदिवशी केवळ 250 लोकांना दर्शन घेण्याची परवानगी आहे. तसंच मंदिरात प्रवेश घेण्यासाठी कोविड-19 निगेटीव्ह सर्टिफिकेट असणे आवश्य आहे.

कानपूर मधील वैभव लक्ष्मी आणि दुर्गा मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी धाव घेतली.

दिल्लीतील कालका जी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या.

दिल्लीतील झंडेवालान मंदिरात मंत्रपठण केले जात आहे.

दिल्लीतील झंडेवालान मंदिरात नवरात्रीनिमित्त भाविकांनी भेट दिली.

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंदिरं खुली नसल्यामुळे भक्तांसाठी ऑनलाईन माध्यमातून दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच यंदा अगदी साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा गरबा, दांडियाची धूमही अनुभवता येणार नाही. मात्र व्हर्च्युअल माध्यमातून आपण नवरात्रीचे सेलिब्रेशन नक्कीच करु शकतो.