आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. हे दिवस अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे असतात. घरोघरी घट बसतात. काहींच्या घरी देवीचे आगमन होते. सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजे गरबा, दांडीया, विविध स्पर्धा यांची धूम. मात्र यंदा कोरोना व्हायरसचे सावट नवरात्रोत्सवावर असल्याने गरबा दांडीया रद्द करण्यात आला आहे. तसंच हा उत्सव देखील अगदी साध्या स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहावर पाणी पडले आहे. मात्र नाराज होण्याचे कारण नाही. यापूर्वी अनेक सण, उत्सव आपण कोरोना व्हायरसच्या सावटाखाली साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे काही हटके आयडियाज वापरुन आपण नवरात्रोत्सव साजरा करु शकतो.
सध्याच्या डिजिटल युगात व्हर्च्युअल सेलिब्रेशनचा एक हटके पर्याय आपल्याकडे आहे. त्याद्वारे ऑनलाईन माध्यमातून आपण देवीचे दर्शन घेऊ शकतो. अनेक नवरात्री मंडळांमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून दर्शन, आरतीची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. तसंच घरगुती देवीचे, घटाचे दर्शनासाठीही तुम्ही ऑनलाईन माध्यमांची निवड करु शकता. (नवरात्री नऊ रंग 2020 मध्ये घटस्थापना ते दसरा दरम्यान पहा यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?)
ऑनलाईन दर्शन:
कोरोना व्हायरस संकटामुळे यंदा नवरात्रोत्सव अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी देवीचे ऑनलाईन दर्शन घेण्याचा पर्याय अतिशय उचित आहे.
पूजा लाईव्ह स्ट्रिमिंग:
कोविड-19 संकटामुळे राज्यात अद्याप मंदिरं अद्याप खुली करण्याता आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठं मंदिरांमध्ये देवीचे पूजा, आरती याच्या लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय केल्यास भाविक घरबसल्या त्याचा लाभ घेऊ शकतात.
घरच्या घरी बनवा देवीसाठी खास पदार्थ:
नऊ दिवस देवीला नैवेद्यासाठी घरच्या घरीच विविध पदार्थ बनवा. कोविड-19 संकटात बाहेरचे पदार्थ खाणे टाळणायचे असल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.
व्हर्च्युअल सेलिब्रेशन:
नवरात्रोत्सवात भोंडला खेळण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तसंच गरबा, दांडीया याची धूम तर असतेच. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे यंदा सारं काही रद्द करण्यात आलं आहे. मात्र व्हर्चुअल माध्यमातून नातेवाईक, मित्रमंडळींसोबत तुम्ही याचा आनंद नक्कीच घेऊ शकता.
दरवर्षी नवरात्रोत्सवात देवींच्या मंदिराबाहेर, सार्वजनिक मंडळांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसतात. तर रात्री गरब्याची गाणी कानावर पडतात. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे हा सगळा उत्साह मावळला आहे. परंतु, व्हर्चुअल सेलिब्रेशद्वारे तुम्ही यंदाचा नवरात्रोत्सव देखील खास करु शकता.