Datta Jayanti 2019:  दत्त जयंती दिवशी पारायण केल्या जाणार्‍या श्री गुरूचरित्र मिळणारे मोलाचे संदेश
Datta Jayanti 2019 | Photo Credits: File Photo

महाराष्ट्रासह आज देशभरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा अंश असलेल्या दत्तात्रयाचा मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी जन्म झाला त्यामुळे दत्त संप्रादयातील लोकांसाठी दत्त जयंतीचा दिवस हा मोठा खास असतो. या दिवशी दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्ताचं दर्शन घेण्यासोबतच घरगुती स्वरूपात दत्त जयंती साजरी करणारी अनेक मंडळी श्री गुरूचरित्र याचं पठण करतात. 14व्या शतकामध्ये नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य आणि अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ 15व्या शतकामध्ये श्री सरस्वती गंगाधर स्वामी यांनी लिहले आहे. गुरूचरित्रामध्ये एकून 53 अध्याय असून आठवडाभर गुरूचरित्राचे पारायण करण्याची प्रथा आहे.

दत्तचरित्रातील प्रत्येक अध्याय आपल्याला काही संदेश देऊन जाते मग जाणून घ्या या दत्तचरित्रातून मिळणार्‍या संदेशाचं महत्त्व आहे. Happy Datta Jayanti 2019 Images: दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारे HD Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status शेअर करून तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास संदेश!

दत्तचरित्रातील प्रत्येक अध्याय तुम्हांला काही शिकवण देऊन जातो, त्यामधील प्रत्येक अध्याय आपल्याला खास शिकवण देऊन जातो. जीवनातील विविध पैलूंकडे सकारत्मकतेने पाहण्याचा आशावाद आपल्याला चरित्रातील प्रत्येक अध्यायामध्ये पहायला मिळतो. जीवनातील प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी वळणं येतात. पण त्या सार्‍याचा सामना करून पुढे जाणं भाग आहे. सद्गुरूंना शरण जाताना श्रद्धा, एकाग्रता, भक्ती कायम ठेवा. फुलं वेचताना काटे बोचणं सहाजिक आहे. पण हे काटे देखील अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मदत करतात. म्हणजेच या आयुष्यरूपी बगिच्यामध्ये चांगले, यशाचे टप्पे हे फुलांसारखे आहेत मात्र काट्यांसारख्या येणार्‍या अडचणी देखील तुम्हांला खूपकाही शिकवून जातील त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पहायला शिका. असा मोलाचा संदेश श्रीगुरूचरित्रातून दिला आहे. Datta Jayanti Special Songs: दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरूंचा अगाध लीला सांगणारी '5' भावपूर्ण गाणी.

गुरूचरित्रातून आपल्याला प्रगतीचा मार्ग दिसतो. त्यामुळे पूर्वकर्माची निष्कृती झाली की माणसामधील अहंकार भाव संपतो असे गुरूचरित्र आपल्याला शिकवतो. मग दत्ताच्या विविध रूपातील महात्म्याचा आजच्या दिवशी स्मरण करून दत्त जयंतीचा उत्सव साजरा करा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )