Datta Jayanti Marathi Songs: दत्त जयंती दिनाचे औचित्य साधून आज अनेक भक्त आपल्या दत्तगुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी दत्तक्षेत्रात जातील. दत्ताचे आपले भक्तांवर अपार प्रेम आहे. ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि संकटसमयी त्यांच्या साठी धावून येतात. फक्त त्याच्या भक्ताची आर्त हाक त्याच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी त्या भक्ताचे मन साफ असले पाहिजे आणि मनोभावे त्याने आपल्या दत्तगुरुंचा नामस्मरण केले पाहिजे. अशा या भक्ताची आर्त हाक दत्तगुरुंपर्यंत पोहोचविण्यासाठी सुंदर शब्दांत गुंफलेली गाणी अनेकदा आपल्या कानावर येतात.
दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्ताच्या नामस्मरणात भक्त रंगून जाण्यासाठी '5' खास गाणी, भजने.
मला हे दत्तगुरु दिसले
दत्ता दिगंबरा या हो
दत्त दिगंबर दैवत माझे
धन्य धन्य हो प्रदक्षिणा
निघालो घेऊन दत्ताची पालखी
ही गाणी, भजने सदैव आपल्या ओठी राहतील अशीच आहे. मात्र दत्त जयंती च्या निमित्ताने ही गाणी आपल्या ओठावर आल्यास आपला आजचा दिवस खूपच मंगलमयी जाईल.