Datta Jayanti 2019 Special Rangoli: दत्त जयंती यंदा 11 डिसेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. दत्त मंदिरामध्ये या दिवशी खास कार्यक्रम आयोजित केले जातात. भजन संध्या, भंडारा यांचं आयोजन केलं जातं. तसेच शोभायात्रा, पालख्या यांचंदेखील आयोजन केलं जातं. त्यामुळे अनेक ठिकाणी रांगोळ्यांच्याही पायघड्या घातल्या जातात. उद्या दत्त जयंतीचं निमित्त साधून खास रांगोळी काढणार असाल तर दत्त जयंती विशेष या रांगोळी डिझाईन काढून उद्याचा खास दिवस साजरा करा. Datta Jayanti 2019: दत्त जयंती यंदा 11 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या दत्तात्रेय जयंतीचं महत्त्व, पूजा वेळ काय?
दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचं स्वरूप मानलं जातं. असं म्हटलं जातं की दत्तात्रेयामध्ये गुरू आणि देवता या दोघांचाही मिलाफ असल्याने त्यांना गुरूदेव दत्त म्हणूनही संबोधलं जातं.
दत्त जयंती विशेष रांगोळी
हिंदू मान्यतांनुसार, भगवान दत्तात्रेय हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिघांचा अंश असलेले अवतार आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यांच्या बालरूपाची देखील पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती, लक्ष्मी माता आणि सावित्री या तिन्ही देवतांना आपल्या पतिव्रत धर्मावर अहंकार होता. जेव्हा नारद मुनींना हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्तात्रेयाची निर्मिती केली.