Merry Christmas 2024 HD Images: ख्रिसमस (Christmas 2024) हा असा खास सण आहे जो ख्रिश्चन धर्मासोबतच इतर धर्माचे लोकही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार, येशू ख्रिस्ताचा जन्म त्याच दिवशी झाला होता. म्हणून, या विशेष दिवशी ख्रिश्चन समाजातील लोक एकत्र येतात आणि प्रभु येशूची पूजा करतात. तसेच एकत्र ख्रिसमस कॅरोल गातात. यानंतर लोक या सणाला मेरी ख्रिसमस म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात.
ख्रिश्चन धार्मिक मान्यतानुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. म्हणून दरवर्षी या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियावर तसेच प्रत्येक्षात भेटून नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील ख्रिसमस निमित्त सोशल मीडियावर HD Images, Greetings, Quotes, Wishes शेअर करून तुमच्या मित्र-परिवारासोबत नाताळ सणाचा आनंद द्वगुणित करू शकता. यासाठी तुम्ही खालील HD ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
मेरी ख्रिसमस HD ईमेजेस -
आपणा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस!
सर्व ख्रिस्ती बांधवाना
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस…
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस!!!
ख्रिसमस डेचा इतिहास -
नाताळ सणाच्या इतिहासाबाबत अनेक इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काही इतिहासकारांच्या मते, हा सण येशूच्या जन्मानंतर साजरा केला जाऊ लागला, तर काहींच्या मते हा सण येशूच्या जन्मापूर्वीही साजरा केला जात होता. त्यांचा असा विश्वास आहे की, हा सण रोमन सण सँक्टुनलियाचे नवीन रूप आहे. सँक्चुलिया हा रोमन देव आहे असे म्हटले जाते. जेव्हा ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली तेव्हा लोकांनी येशूला आपला देव मानून ख्रिसमस डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण -
ख्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा सर्वात मोठा सण आहे, त्यामुळे त्याची तयारी काही दिवस आधीच सुरू होते. या दिवशी चर्चमध्ये येशू ख्रिस्ताची जयंती साजरी करण्यासाठी विशेष प्रार्थना केल्या जातात आणि विविध ठिकाणी प्रभु येशूची तक्ते सादर केली जातात. या दिवशी लोक त्यांच्या घरात ख्रिसमस ट्री सजवतात. या दिवशी मुले सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहतात.