
Merry Christmas HD Images 2019: ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र सण म्हणजे ख्रिसमस (Christmas) . मराठी मध्ये या सणाला नाताळ (Christmas Day) असेही म्हटले जाते. प्रतिवर्षी 25 डिसेंबर या दिवशी ख्रिसमस हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 25 डिसेंबर हा ख्रिश्चन धर्म संस्थापक येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मियांची श्रद्धा आहे की, नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' पर्वाची सुरुवात करतो. सांगितले जाते की, इसवी सन 345 या वर्षी पहिला पोप ज्युलियस याने येशु ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून ‘२५ डिसेंबर’ हा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण 25 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. जगभरातील ख्रिस्ती बांधव, येशू ख्रिस्त यांचे अनुयाई आणि जगभरातील विविध देशांतील नागरिक नाताळ सणात सहभागी होतात. आपणही नाताळ (ख्रिसमस) सणाच्या पवित्र स्मृती आपले मित्र, नातेवाईक, अनुयायी आणि अभ्यासक यांच्यासोबत शेअर करु शकता. त्यासाठी खास Merry Christmas 20 HD Greetings, Wallpapers, Wishes. या इमेजच्या सहाय्याने नाताळ शुभेच्छा सोशल मीडियावरही शेअर करु शकता.
नाताळच्या शुभेच्छा..!

>नाताळच्या शुभेच्छा..!

नाताळच्या शुभेच्छा..!

नाताळच्या शुभेच्छा..!

नाताळच्या शुभेच्छा..!

मेरी ख्रिसमस..!

(हेही वाचा, Christmas 2019: नाताळ सण साजरा करण्यामागची 'ही' कथा तुम्हाला माहित आहे का?)
मेरी ख्रिसमस..!

मेरी ख्रिसमस..!

मेरी ख्रिसमस..!

नाताळात ख्रिसमस ट्री ला का आहे विशेष महत्व;जाणून घ्या यामागची कारणे Watch VIdeo
नाताळ हा सण ख्रिस्ती बांधव प्रामुख्याने सायंकाळच्य यावेळी साजरा करतात. काही ठिकाणी या सणाऐवजी एपिफनी सण ही साजरा केला जातो. हा सण 6,7 किंवा 19 जानेवारीला साजरा केला जातो. दरम्यान, ख्रिसमस हा सण साजरा करताना ख्रिस्ती धर्मिय बांधवातही काही सूक्ष्म असे मतभेद आढळतात. भगवान येशूच्या जन्माच्या सांगितल्या जाणाऱ्या कथांमध्ये प्रामुख्याने मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या कथा आढळतात. या कथांमध्ये ख्रिस्ती नागरिकांनी सुचवलेल्या तारखा वेगवेगळ्या आहेत. काही कथांमध्ये दावा करण्यात आलेला आहे की, हा सण प्रथम इसवी सन पूर्व 336 मध्ये रोम येथे साजरा करण्यात आला. दरम्यान, असे असले तरी ख्रिस्ती बांधव आणि जगभरातील असंख्य नागरिक हा सण मात्र धुमधडाक्यात साजरा करतात.