Chinchpokli Cha Chintamani 2019 First Look: अवघ्या 22 दिवसांवर यंदाची गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईतील लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक म्हणजे 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'(Chinchpokli Cha Chintamani)चा आगमन सोहळा रंगणार आहे. यंदा या चिंतामणीचं 100 वं वर्ष असल्याने लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील चिंतामणीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. दुपारी 2 च्या सुमारास चिंचपोकळीचा चिंतामणी मार्गस्थ होणार आहे.
मागील वर्षी चिंतामणीच्या आगमन सोहळ्यादरम्यान उत्साही गणेशभक्तांच्या गर्दीमुळे काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. ही बाब लक्षात घेता यंदा करी रोड येथील पूलावर मोजक्याच कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर चा आगमन सोहळा गणेश टॉकिजपासून सुरू होणार आहे. येथे पहा चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा 2019 ची झलक
चिंचपोकळीचा चिंतामणी 2019 ची पहिली झलक
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी
चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यात सहभागी होऊ न शकणार्यांना युट्युब आणि फेसबूकच्या माध्यमातून हा सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे.
पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला मागील काही दिवसांमध्ये पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन आणि गावांच्या पुनर्वसनासाठी आता देवस्थानांनी पुढाकार घेतला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने देखील मदतीचा हात पुढे करत आज आगमन सोहळ्यामध्ये सहभागी होताना दान करण्याचं आवाहन केलं आहे. Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?
चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती मंडळाची सुरूवात 1920 साली झाली. हळूहळू या मंडळाची ख्याती वाढली. विजय खातू परेल येथील खातूंच्या कार्यशाळेत चिंतामणीची मूर्ती घडवली जाते. चिंतामणीचे मूळ मूर्तिकार विजय खातू यांच्या निधनानंतर हा वसा त्यांच्या मुलीने म्हणजेच रेश्मा खातू हिने चालू ठेवला होता.