अवघ्या हिंदुस्थानचे दिशादर्श छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2022 HD Images) आहे. पुण्यतिथीनिमित्ताने अवघा महाराष्ट्र भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना वंदन केले जात आहे. अलौकीक बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी आणि संयम या गुणाद्वारे कोणत्याही संकटाला तोंड देता येते. शत्रूवर लिलया मात करता येते हे शिवाजी महाराजांनी वारंवार दाखवून दिले. राज्य कारभार करताना त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि आयुष्यभर पाळलेली नीतीतत्वे आजही मार्गदर्शक आहेत. शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना डिजिटल रुपात वंदन करण्यासाठी WhatsApp, Facebook Status, Messages HD Images इथे देत आहोत. जे वापरुन आपण आपल्या आदर्शपुरुषाला वंदन करु शकता.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मुठभर मावळ्यांच्या सोबतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी रोवलेली स्वराज्याची मुहूर्तमेढ अविरत तेवते आहे. त्यांच्या निधनानंतर आज शेकडो वर्षे उलटून गेली तरीही त्यांच्या शिकवणीवर त्यांचे स्वराज्य आज वाटचाल करते आहे. औरंगजेब आणि आदिलशाह यांच्यासारख्या त्या काळच्या बलाढ्य शत्रूसोबत लढा देणे तेव्हा साधी गोष्ट नव्हती. शिवरायांनी ती लिलया पेलली.
समुद्रतटांवर, दऱ्याखोऱ्यांमध्ये असलेले गड, किल्ले आजही शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगत असतात. आज या किल्ल्यांची पडझड झाल्याचे पाहायला मिळते. पण पाठीमागील अनेक वर्षांपासून आजही हे गड किल्ले तसेच उभे आहेत. वारा, गारा आणि पावसाचा मारा खात. त्याची वीटही आज हालताना दिसत नाही. यातूनच त्यांच्या दूरदृष्टीची जाणीव होऊन जाते. अशा या शिवरायांना त्रिवार वंदन.