Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2020 Images: संभाजी महाराज जयंती दिवशी मराठमोळी Wishes, HD Greetings, Wallpapers, Images शेअर करून साजरी करा शंभुराजे जयंती!
Sambhaji Maharaj Jayanti 2020 Image (PC - File Image)

Sambhaji Maharaj Jayanti 2020 Marathi Wishes and Messages: आज 14 मे संभाजी महाराजांचा तारखेनुसार, जन्मोत्सवाचा दिवस!  मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र, स्वराज्याचे पहिले युवराज, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांचा जन्मदिन.  आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. संभाजी राजांचा जन्म 14 मे इ.स. 1656 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. संभाजीराजांच्या आई, सईबाईं यांचे निधन राजे लहान असतानाच झाले. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. या शुर योद्ध्याच्या जयंती निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Wishes, HD Greetings, Wallpapers, Images, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून शंभूराजांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या.

छत्रपची संभाजी महाराज हे अत्यंत शूर योद्धा होते. ते अनेक भाषांत विद्याविशारद होते. राजकारणातील बारकाव्यांची त्यांना जाणीव होती. इ.स. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.

Sambhaji Maharaj Jayanti 2020 Image (PC - File Image)
Sambhaji Maharaj Jayanti 2020 Image (PC - File Image)
Sambhaji Maharaj Jayanti 2020 Image (PC - File Image)
Sambhaji Maharaj Jayanti 2020 Image (PC - File Image)
Sambhaji Maharaj Jayanti 2020 Image (PC - File Image)
Sambhaji Maharaj Jayanti 2020 Image (PC - File Image)

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: संभाजी महाराज यांच्याबद्दल काही खास गोष्टी - Watch Video

शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सर्व सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली. 16 जानेवारी इ.स. 1681 रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला. संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला.