छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याची कमान सांभाळणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj ) शौर्यकथा अंगावर काटा आणणार्या आहेत. संभाजी राजे हे शिवबांचे ज्येष्ठ पुत्र होते. 16 जानेवारी दिवशी त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता. त्यामुळे दरवर्षी 16 जानेवारीला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शिवभक्त साजरा करतात. या दिवसाच्या निमित्ताने शिवभक्तांना मराठमोळे मेसेजेस, Wishes, Images, Quotes शेअर करत या दिवसाचा आनंद तुमच्या मित्रमंडळी, नातलगांसोबत शेअर करा.
संभाजी राजे यांना 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि नंतर त्यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच भव्य आणि उत्साहात संपन्न झाला होता. Chhatrapati Samabhaji Maharaj Rajyabhishek Din 2024 Wishes: छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी अभिवादन करणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र!
छत्रपती संभाजी राजे यांना राज्याभिषेक दिनी मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे यांनी अडचणीच्या काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले. त्याची कारकीर्द प्रामुख्याने मराठा राज्य आणि मुघल साम्राज्य, तसेच गोव्यातील सिद्दी, म्हैसूर आणि पोर्तुगीज यांसारख्या शेजारील सत्ता यांच्यात सुरू असलेल्या युद्धांना तोंड देण्यात गेली. 1689 मध्ये जेव्हा संभाजी महाराज कपटाने पकडले गेले तेव्हाही संभाजी महाराज यांनी स्वतःवर होणार्या छळ आणि अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला. शेवटी 11 मार्च 1689 रोजी त्यांचे कैदेत असतांना वीर मरण आले