कर्मवीर, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान. अवघे 33 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. राजपुत्र असल्याने संभाजी महाराजांना राजकारणातील डावपेच आणि रणांगणावरील युक्त्या यांचे शिक्षण घरातूनच मिळाले होते. राजे शस्त्रात, शास्त्रात, कलेत, विद्येत पारंगत होते. थोरल्या महाराजांच्या मृत्यूवेळी संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. 18 जून 1680 रोजी ते रायगडास पोहोचले आणि 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर विधिवत संभाजी महाराजांचा राज्याभिषेक (Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din) झाला.
संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने रयतेला नवा आधारस्तंभ मिळाला. शिवाजी महाराजांची उभ्या केलेल्या स्वराज्याचा कारभार त्यांनी अगदी समर्थपणे आपल्या खाद्यावर घेतला आणि सांभाळला. समोर मृत्यू दिसत असतानाही शत्रूपुढे शरण न जाण्याची शिवरायांची शिकवण अंगी बाळात त्यांनी आपल्या बलिदानाने इतिहास रचला. अशा थोर राजाचा आज राज्याभिषेक दिन सोहळा. या दिनाचे औचित्य साधत तुम्ही काही खास Wishes, Messages, HD Images शेअर करून शंभूराजेंना त्रिवार अभिवादन करू शकता.
दरम्यान, संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई यांच्या निधनानंतर जिजाबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. संभाजी महाराज हे संस्कृत सोबत 8 इतर भाषांमध्ये निपुण होते. राजेंनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत 140 पेक्षा जास्त युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. अशा या थोर आणि शूर राजाचे 11 मार्च 1689 मध्ये भीमा इंद्रायणी नदीचा संगम होत असलेल्या आळंदी जवळच्या तुळापुर येथे निधन झाले.