
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अकाली मृत्यूनंतर जनेतेचा आधार हरपला. तेव्हा 16 जानेवारी 1681 रोजी शंभुराजेंच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) राज्याभिषेकाने रयतेला नवा आधारस्तंभ मिळाला. शिवाजी महाराजांची उभ्या केलेल्या स्वराज्याचा कारभार अगदी समर्थपणे सांभाळला. समोर मृत्यू दिसत असतानाही शत्रूपुढे शरण न जाण्याची शिवरायांची शिकवण पाळत त्यांनी बलिदानाचा इतिहास रचला. अशा थोर राजाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरम्यान, यानिमित्ताने सोशल मीडिया माध्यमाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) याद्वारे शुभेच्छा देत शंभुराजेंच्या आठवणीही जागवल्या जातात. तर छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनादिवशी Wishes, Messages, HD Images कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शिवभक्त यांच्यासोबत शेअर करुन शंभूराजेंना त्रिवार अभिवादन करा.
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन शुभेच्छा!
हिमालयाएवढे शौर्य असलेले
महापराक्रमी,
छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती
श्रीशंभुराजे यांना राज्याभिषेक
दिनानिमित्त मानाचा मुजरा!

छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन!

कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी झाला...
राज्याभिषेक दिनानिमित्त
श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन!

स्वराज्याच्या मातीसाठी अमर झालेले
छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!

छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे पुत्र संभाजीराजे. लहानपणीच आईचे छत्र हरपल्याने त्यांचा सांभाळ जीजाऊ आणि शिवाजी महाराजांनी केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर बाल राजाराम यांना गादीवर बसवून स्वार्थी दरबारी मंत्र्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना त्यात अपयश आले आणि स्वराज्याला संभाजी राजांच्या रुपात दुसरे छत्रपती लाभले.