छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)

Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2022 Images: आपल्या पराक्रमाच्या जोरावर मुघलांना गुडघे टेकण्यास भाग पाडणारे भारताचे शूर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र संभाजी महाराज यांचा आज म्हणजेच 11 मार्च रोजी बलिदान दिवस साजरा होत आहे. वडील छत्रपती महाराजांप्रमाणेचं संभाजी महाराजांचे जीवनही देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते. शंभू महाराजांना अगदी लहान वयात संघर्ष पाहायला मिळाला. त्यांना लहानपणापासूनचं स्वराज्याचे धडे मिळाले होते. त्यामुळे पुढे त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला.

संभाजी राजे भोसले यांचा जन्म 14 मे 1647 रोजी झाला होता. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. लहानपणीचं संभाजीच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची आजी जिजाबाईंनी त्यांची काळजी घेतली. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून शंभुराजेंच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील.

छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)
छत्रपती शंभुराजे महाराज बलिदान दिन (Photo Credits-File Image)

कवी कलश यांच्या संपर्काने व मार्गदर्शनाने संभाजींची साहित्याची आवड वाढू लागली. संभाजींनी त्यांचे वडील शिवाजी यांच्या सन्मानार्थ संस्कृतमध्ये बुद्धचरित्रही लिहिले. संभाजी महाराजांनी त्यांच्या अल्पशा आयुष्यात हिंदू समाजाच्या हितासाठी मोठे यश संपादन केले होते. ज्यासाठी प्रत्येक हिंदू कृतज्ञ आहे. त्यांनी औरंगजेबाच्या 8 लाख सैन्याचा सामना केला आणि अनेक युद्धांमध्ये मुघलांचा पराभव केला.