
Chaitra Navratri HD Images: चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी 'गुढीपाडवा' असतो. त्याचबरोबर 'चैत्र नवरात्री'चा देखील आरंभ होतो. यंदा मंगळवार, 13 एप्रिल ते बुधवार, 21 एप्रिल पर्यंत नवरात्रोत्सव आहे. या नवरात्रोत्सवाला 'वासंतिक नवरात्र' असं म्हणतात. या नवरात्रीत दुर्गेची पूजा म्हणजेच निर्मिती शक्तीची पूजा केली जाते. चैत्र नवरात्र हे वसंत ऋतूत असतं. वसंत ऋतूत साऱ्या सृष्टीमध्ये नवनिर्मितीचे दर्शन घडते. निर्मितीच्या याच शक्तीचे पूजन चैत्र नवरात्रीत केले जाते. नऊ दिवसांच्या या नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची पूजा प्रार्थना केली जाते. दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागणार आहे.
चैत्र नवरात्री निमित्त तुमच्यासाठी खास मराठी Greetings, HD Images, Wallpapers, Wishes घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळींना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.
चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा!





सृष्टीतील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा चैत्र नवरात्र साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. तसंच आपल्या सणांमागे विशेष अर्थ दडला आहे. नवनिर्मितीचे पूजन म्हणजेच निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करणे, हा यामागील मूळ हेतू आहे.