
Marathi Bhasha Din 2025 HD Images: मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्रात तसेच ज्या ठिकाणी मराठी भाषिक समुदाय आहे, त्याठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी आयोजन करून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत मराठीच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसासाठी मराठी भाषा दिवस खूप खास असतो. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din 2025) सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यासाठी पारंपारिक नृत्य, संगीत आणि नाट्य सादरीकरणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांचा उद्देश तरुण पिढ्यांमध्ये मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण हा असतो. या दिवशी तुम्ही सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवारास मराठी भाषा दिनाच्या दिवशी Wishes, WhatsApp Status, Messages द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांचा दिवस खास करू शकता.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा -
महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हा सर्वांना
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दरी-खोर्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी…मी मराठी!
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी भाषा दिनाच्या दिवशी प्रत्येक मराठी व्यक्ती या दिवशी मराठी भाषेचे गोडवे गातो. मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. जगभरातील 83 दशलक्षाहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेला एक विशाल आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक परंपरा आहे, ज्यामध्ये कविता, गद्य, नाटक आणि इतर विविध प्रकारांचा समावेश आहे.