Happy Valentine's Day 2025 Messages 6 (फोटो सौजन्य - File Image)

Happy Valentine's Day 2025 Messages: व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2025) साजरा करण्याची सुरुवात एक आठवडा आधीच होते. या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक असं म्हटलं जातं. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week) सुरू होतो. या आठवड्यातला प्रत्येक दिवस खास असतो आणि तो खास पद्धतीने साजरा केला जातो. या आठवड्यात वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. ज्यामध्ये एकमेकांवर प्रेम करणारे जोडपे त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या जोडीदारांना भेटवस्तू देतात.

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाच्या आठवड्याचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी जोडपे डेटवर जाऊन, एकमेकांना भेटवस्तू देऊन, एकत्र दर्जेदार वेळ घालवून किंवा सरप्राईज देऊन हा खास प्रसंग साजरा करतात. दरवर्षी 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून WhatsApp Status, Greetings शेअर करून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतात.

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा - 

तुझ्या प्रेमाचा रंग तो…

अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत….

मी फक्त तुझीच आहे !!!

Happy Valentines Day !

Happy Valentine's Day 2025 Messages 1 (फोटो सौजन्य - File Image)

बंध जुळले असता,

मनाचं नातंही जुळायला हवं…

अगदी स्पर्शातूनही

सारं सारं कळायला हवं…

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentine's Day 2025 Messages 2 (फोटो सौजन्य - File Image)

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं

तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentine's Day 2025 Messages 3 (फोटो सौजन्य - File Image)

डोळ्यातल्या स्वप्नाला…

कधी प्रत्यक्षातही आण,

किती प्रेम करतो तुझ्यावर

हे न सांगताही जाण…

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentine's Day 2025 Messages 4 (फोटो सौजन्य - File Image)

संगीत जुनच आहे

सूर नव्यानं जुळताहेत

मनही काहीसं जुनच

तेही नवी तार छेडताहेत

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Happy Valentine's Day 2025 Messages 5 (फोटो सौजन्य - File Image)

 

व्हॅलेंटाईन डेचा इतिहास रोमशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. असे मानले जाते की रोममध्ये एक पुजारी होता ज्याचे नाव संत व्हॅलेंटाईन होते. प्रेम हेच त्याचे जीवन होते. अशी एक कथा आहे की, संत व्हॅलेंटाईन तुरुंगात असताना, तो जेलरच्या मुलीच्या, जेकबसच्या प्रेमात पडला. त्याच्या मृत्यूपूर्वी, त्याने जेकबसला एक पत्र लिहिले, ज्यामध्ये त्याने तुझा व्हॅलेंटाईन असे लिहिले. तेव्हापासून हा शब्द प्रेम आणि त्यागाचे प्रतीक बनला. त्यानंतर, संत व्हॅलेंटाईनच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 14 फेब्रुवारी रोजी प्रेमाचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.