Happy Valentine's Day 2025 HD Images 6 (फोटो सौजन्य - File Image)

Happy Valentine's Day 2025 HD Images: सध्या प्रेमाचा आठवडा सुरू आहे. दरवर्षी, जगभरात, फेब्रुवारी महिन्यातील एक संपूर्ण आठवडा प्रेमींना समर्पित असतो. या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणतात, ज्याचा प्रत्येक दिवस प्रेमींना एकमेकांच्या जवळ आणतो. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ला संपतो. दरम्यान या आठवड्यात रोझ डे, प्रपोज डे आणि प्रॉमिस डे असे अनेक दिवस साजरे केले जातात, जे जोडप्यांना एकमेकांच्या जवळ आणतात.

प्रेमासाठी लढणाऱ्या संत व्हॅलेंटाईनच्या सन्मानार्थ व्हॅलेंटाईन डेची सुरुवात झाली. या संपूर्ण आठवड्यात, वेगवेगळ्या दिवसांना विशेष महत्त्व आहे, जे वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करण्याची संधी देतात. आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. हा दिवस प्रेम आणि नातेसंबंधांचा सर्वात खास दिवस आहे. या दिवशी प्रेमी एकमेकांना खास भेटवस्तू, फुले आणि प्रेमाचे संदेश देतात. या दिवशी तुम्ही खालील ग्रीटींग्ज पाठवून आपल्या जोडीदाराला खास शुभेच्छा देऊ शकता.

व्हॅलेंटाईन डे च्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Happy Valentine's Day 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Valentine's Day 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

मी वेडा असलो तरी,

वेड मात्र तुझेचं आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Valentine's Day 2025 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

आजन्म मला तुझे असेच प्रेम मिळू दे

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Valentine's Day 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

मला आयुष्यभर तुला जपायचे आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Valentine's Day 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

रोममध्ये प्रेम आणि लग्नाच्या समर्थनार्थ आवाज उठवणाऱ्या संत व्हॅलेंटाईनच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. त्या वेळी सम्राट क्लॉडियस दुसरा याने सैनिकांच्या लग्नांवर बंदी घातली होती, परंतु संत व्हॅलेंटाईनने आपल्या प्रियसीशी लग्न केले. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याने 14 फेब्रुवारी रोजी संत व्हॅलेंटाईनला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. पुढे हा दिवस प्रेमाचे प्रतीक बनला.