
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे पुत्र संभाजी महाराज यांच्या आईचे निधन झाले तेव्हा ते फक्त दोन वर्षांचे होते. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला होता. त्यांचे वडील शिवाजी महाराज आणि आजी जिजाबाई यांच्या देखरेखीखाली ते मोठे झाले. 1670 पासून, शिवाजी महाराजांनी त्यांना महत्त्वाच्या प्रशासकीय कामांची जबाबदारी सोपवली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळीचं संभाजींना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई आणि त्यांच्या समर्थकांनी संभाजी महाराजांऐवजी राजारामाचा राज्याभिषेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्वोच्च सेनापती हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांची बाजू घेतली. 1881 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर ते स्वराज्याचे छत्रपती बनले. संभाजी महाराजांनी मुघल सैन्याविरुद्ध 9 वर्षे लढा दिला. दरवर्षी संभाजी महाराजांची जयंती (Sambhaji Maharaj Jayanti 2025) 14 मे रोजी साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना संभाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतात आणि त्यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण काढतात. तुम्ही देखील खालील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन धर्मवीर शंभूराजांची जयंती साजरी करू शकता.
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर जाहला
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला 'संभाजी' होता
जय संभाजी
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

मृत्यू लाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा.
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

संभाजी महाराजांनी गोव्यात पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढा दिला. त्यांच्या सामूहिक धर्मांतरांना आणि मंदिर पाडण्यास सक्रियपणे विरोध केला. तसेच गोव्यात हिंदू समुदायांचे पुढील ख्रिस्तीकरण रोखले.