Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi: अक्षय तृतीया ((Akshaya Tritiya) हा दोन शब्दांपासून बनलेला आहे, 'अक्षय' म्हणजे कधीही न संपणारा आणि 'त्रितिया' म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस. असे मानले जाते की या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य किंवा गुंतवणूक शाश्वत फळ देते. जैन आणि हिंदू समुदायांसाठी अतिशय शुभ सण असलेला अक्षय तृतीयेचा (Akshaya Tritiya 2025) सण या वर्षी बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल.

हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो. हिंदू कॅलेंडरनुसार, हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. पौराणिक मान्यतांनुसार, या दिवशी केलेले कोणतेही चांगले काम किंवा गुंतवणूक नेहमीच भरभराटीला येते. या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा देखील विशेष मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतात. त्यामुळे आम्ही देखील तुमच्यासाठी अक्षय्य तृतीयेसाठी Messages, Images, WhatsApp Status घेऊन आलो आहोत. तुम्ही हे शुभेच्छा संदेश आपल्या मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियाद्वारे शेअर करून अक्षय्य तृतीयेचा सण आणखी खास करू शकता.

सोन्याचा रथ, चांदीची पालखी,

ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,

तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi (फोटो सौजन्य - File Image)

नोटांनी भरलेला खिसा असो

प्रेमाने भरलेला मनाचा कप्पा असो

या अक्षय्य तृतीयेला मिळू दे,

घरच्यांचं प्रेम हीच कामना मनोमनी असो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

आपल्या माणसांना जपून एकमेंकाना मदत करूया,

या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने चला काही दान-धर्म करूया

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

अक्षय राहो मानवतेचा

क्षय होवो ईर्षेचा

जिंकू दे प्रेमाला

आणि हरू दे पराभवाला,

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

अक्षय्य सुखाचा दिलासा

मनात कर्तुत्वाचा भरवसा

लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा

शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

अक्षय तृतीया म्हणजे शाश्वत आणि कधीही न संपणारी तृतीया असा आहे. हा दिवस सोने आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. कारण असे म्हटले जाते की, या दिवशी असे केल्याने भविष्यात संपत्ती आणि समृद्धी मिळते.