Narali Purnima 2024 Wishes 6 (Photo Credit - File Image)

Narali Purnima 2024 Wishes In Marathi: यंदा नारळी पौर्णिमा (Narali Purnima 2024) चा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा केल्याने भगवान वरुण प्रसन्न होतात आणि सर्व प्रकारच्या दुर्दैवी घटनांपासून मच्छीमारांचे रक्षण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार उपवास करतात आणि समुद्रात नारळ अर्पण करून भगवान वरुणची पूजा करतात.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव निसर्गाप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झाडे लावतात. तसेच एकमेकांना शुभेच्छा देतात. नारळी पौर्णिमा उत्साहात, जल्लोषात साजारा करण्यासाठी तुम्ही कोळी बांधवांना व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक मेसेजच्या माध्यमातून नारळी पौर्णिमेच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. (हेही वाचा - Narali Purnima 2024 Date and Significance: नारळी पौर्णिमेची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)

कोळीवारा सारा सजला गो

कोळी यो नाखवा सजलाय गो

मासळीचा दुष्काळ सरू दे

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

दर्या माझ्या भावा

कृपा कर मझं वरी

खळवळू नको आम्हावरी

हीच आमुची मागणी

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण नारली पुनवेचा,

दर्या सारंगा नमन तुजला !

सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

सण जिव्हाळ्याचा दिवस आज

नारळी पौर्णिमेचा

समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

नारळी पौर्णिमा तुम्हाला

आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,

समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

राज्यात समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेचा खास उत्साह असतो. या दिवशी सर्व कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आणि मासेमारीसाठी वरुण देवाकडे आशीर्वाद मागतात.