Maghi Ganesh Jayanti 2024 HD Images: हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश जयंती (Ganesh Jayanti 2024) दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. याला माघ विनायक चतुर्थी (Magh Vinayak Chaturthi), तिलकुंड चतुर्थी (Tilakund Chaturthi) आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. यंदा 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे. हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस आहे. जो कोणी या दिवशी श्रीगणेशाची यथायोग्य पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
माघी गणेश जयंतीचा उत्सव हा विशेषत: कोकणातील लोकांसाठी खूपचं खास असतो. या दिवशी गणेश भक्त एकमेकांना बाप्पाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी माघी गणेश जयंतीनिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे शेअर करण्यासाठी काही खास ईमेज घेऊन आलो आहोत. तुम्ही या एचडी ईमेज डाऊनलोड करून आपल्या मित्र-परिवारास माघी जयंतीच्या शुभेच्छा पाठवू शकता. (हेही वाचा - Maghi Ganesh Jayanti 2024 Messages: माघी गणेश जयंती निमित्त Wishes, Greetings, Images, WhatsApp Status शेअर करून साजरा करा बाप्पाचा जन्मोत्सव!)
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया!
माघी गणेशोत्सव हा विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दक्षिण भारतीय मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. मात्र, देशातील बहुतांश भागात भाद्रपद चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस मानला जातो.