Maghi Ganesh Jayanti 2024 Messages: पौराणिक मान्यतानुसार, माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या विनायक चतुर्थीला (Vinayak Chaturthi) गणपतीचा जन्म झाला होता. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी (Maghi Ganesh Chaturthi 2024), माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी (Tilakund Chaturthi 2024) असेही म्हणतात. यंदा 13 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश जयंती (Ganesh Jayanti 2024) साजरी केली जाईल. ग्रोगोरियल कॅलेंडर प्रमाणे माघ मास जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येतो.
माघ महिन्यातील गणेश जयंती प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा आणि कोकणच्या किनारी भागात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. भारताच्या बहुतेक भागांमध्ये, भगवान गणेशाची जयंती भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते ती गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. माघी गणेश जयंती निमित्त Wishes, Greetings, Images, WhatsApp Status मित्र-परिवारांस शेअर करून तुम्ही बाप्पाचा जन्मोत्सव साजरा करू शकता. (वाचा - February Month Festivals and Special Days: मराठी लोकांसाठी फेब्रुवारी महिना आहे खास; जाणून घ्या या महिन्यात साजरे होणारे सण आणि काही खास दिवस)
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
तुम्हाला सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त तुमच्या आगमनाची,
कारण, चतुर्थी आमच्या गणेशाची
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या
पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव…
शुभ सकाळ !
ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया !
आजपासून सुरू होणाऱ्या,
माघी गणेशोत्सवाच्या,
तुम्हाला आणि तुमच्या,
तुमच्या कुटुंबाला,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
माघी गणेश जयंतीनिमित्त काही महत्त्वाच्या पालखी यात्रा, मंदिर उत्सव आणि गणेश मंदिरांमध्ये यात्रेचे आयोजन केले जाते. गणेश जयंतीला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात.