
Buddha Purnima 2024 HD Images: बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2024) हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेचे व्रत आणि स्नान-दानही केले जाते. हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्मांसाठी या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे. यावर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत असले तरी त्या दिवशी स्वर्गीय भाद्राही आहे. वैदिक कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी बुधवार, 22 मे रोजी संध्याकाळी 06:47 वाजता सुरू होईल आणि ही तिथी गुरुवार, 23 मे रोजी संध्याकाळी 07:22 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत वैशाख पौर्णिमा 23 मे रोजी असल्याने बुद्ध पौर्णिमा हा पवित्र सण आज म्हणजेचं 23 मे रोजी साजरा करण्यात येत आहे.
बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी येथे झाला. यासाठी दरवर्षी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमा निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास बुद्धांच्या प्रतिमांसह Messages, Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे बुद्ध पौर्णिमाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
नमो बुद्धाय
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

बुद्ध पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या
जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

यावर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांची 2586 वी जयंती आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बौद्ध धर्मातील लोक प्रार्थना करतात. तसेच बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात.