
Buddha Purnima 2020 Quotes: भारतात अनेकांनी गौतम बुद्ध यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होतं असं म्हटलं जातं. आज संपूर्ण जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज या लेखातून आपण बुद्धांनी सांगितलेले काही प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत. तुम्हीही बुद्धांचे हे विचार आचरणात आणले तर तुमचं आयुष्य नक्की सुखकर होईल.
गौतम बुद्धांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. त्यांनी समाजाला शांततेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे विचार मराठीमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. गौतम बुद्धांचे हे मराठीतील कोट्स (Gautam Buddha Quotes in Marathi) तुम्हाला जगण्यासाठी नक्कीच प्रेरित देतील. (हेही वाचा - Happy Buddha Purnima 2020 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी Messages, Greetings, GIFs, HD Images च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून साजरा करा यंदा गौतम बुद्धांचा जन्मदिवस!)
लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे

द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही. तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो.

सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते.

तीन वस्तू जास्त वेळ लपू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य...

आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करु शकतो.

चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो, त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते.

बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या आहेत. भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते.