
भारतामध्ये दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणाकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 एप्रिल दिवशी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनातज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. यंदा त्याच्या जन्मदिनाचं औचित्य साधत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासोबतच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Quotes सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
आंबेडकर जयंती दिवशी भीम अनुयायी दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी वर एकत्र जमतात. प्रार्थना करतात. या दिवसाच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. त्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार समाजात रूजवले जातात. नक्की वाचा: Bhim Jayanti 2023: यंदा भीमजयंतीचं औचित्य साधत अवकाशात तार्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे रजिस्ट्री; space-registry.org वर तुम्हीही पाहू शकाल तारा.
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भीमाची आठवण कधी मिटणार नाही,
एकच काय हजार जन्म घेतले तरी
भीमराया तुमचे उपकार फिटणार नाही
भीम जयंतीच्या शुभेच्छा

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
भीम अनुयायांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या लाखो शुभेच्छा!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

आयुष्य छान आहे,
थोडे लहान आहे.
पण जयभीम म्हणून
जन्म घेतला यातच
माझी शान आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
दलित समाजाच्या राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासोबतच आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन बाबासाहेबांचा गौरव करण्यात आला आहे.