
Bhaubij Gift Ideas For Your Sister: भाऊबीजेला (Bhaubij) आपल्या लाडक्या बहिणीला काय भेट द्यावी, हा प्रश्न अनेक भाऊरायांना पडलेला असतो. प्रत्येक वर्षी दिवाळी (Diwali) झाल्यानंतर 2 दिवसांनी भाऊबीजेचा सण येतो. या दिवशी बहिण-भावाच्या नात्याला आणखी उजाळा मिळतो. येत्या 29 ऑक्टोबरला ‘भाऊबीजे’चा सण साजरा होणार आहे. त्यामुळे या भाऊबीजेला आपल्या प्रेमळ बहिणीला काही तरी हटके आणि छान गिफ्ट द्यावं, असं प्रत्येक भावाला वाटतं असणारचं. म्हणूनच ‘लेटेस्ली मराठी’ तुमच्या बहिणीच्या गिफ्ट्ससाठी घेऊन आली आहे काही खास पर्याय. (Bhaubij Gifts Ideas For Sister)
वॉलेट किंवा पर्स -

तुमची बहिण शाळेत जाणारी असो किंवा ऑफिसला जाणारी, तिला वॉलेट लागतेच. त्यामुळे या भाऊबीजेला तिला नव्या स्टाईलचे वॉलेट किंवा पर्स गिफ्ट करा.
आकर्षक डायमंड ब्रेसलेट –

मुलींना नेहमीच फॅशन ऍक्सेसरिज आवडतात. त्यामुळे या भाऊबीजेला आपल्या बहिणीचे सौंदर्य खुलविण्यासाठी तिला डायमंडचे ब्रेसलेट नक्कीच गिफ्ट करा.
घड्याळ –

तुमच्या बहिणीसाठी घड्याळ हे अत्यंत चांगले गिफ्ट ठरू शकते. घड्याळ ही उपयोगात येणारी वस्तू आहे. त्यामुळे तुम्ही आणलेलं हे खास गिफ्ट तुमच्या बहिणीला नक्की आवडेल. तुम्ही हे गिफ्ट ऑनलाईन पध्दतीनेही खरेदी करू शकता.
ट्रेडिशनल कुर्ती किंवा फॅशनेबल टॉप्स –

काही सण उत्सवात घालण्यासाठी तुम्ही ट्रेडिशनल कुर्ती घेऊ शकता. तसेच रोज कॉलेजला किंवा ऑफिसला घालायला फॅशनेबल टॉप्सही घेऊ शकता. तुम्ही ऑनलाईन या टॉप्सची खरेदी करू शकता.
मोबाईल पेनड्राइव्ह कनेक्टर –
युएसबी कॉडसारखी असणारी ही कॉड गिफ्ट द्यायला उत्तम पर्याय आहे. या कॉडमुळे मोबाईलमधील डेटा थेट पेनड्राइव्हमध्ये ट्रान्स्फर करता येतो. दरवेळी लॅपटॉप बरोबर नेणं जमतंच असं नव्हे. त्यामुळे अशावेळी ही भेट चांगली उपयोगी येते.
खाऊची भेट –
तुमच्या भावाला किंवा बहिणीला खाऊची आवड असेल तर, चॉकलेट आणि ड्रायफ्रूटचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही हे पदार्थ एखाद्या आकर्षक डब्यात आणि परडीत रॅप करून आपल्या बहिणीला देऊ शकता.
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.