Representational Image (Photo Credits: File Image)

दिवाळीच्या (Diwali 2020) काळात जे पाच दिवस साजरे होतात त्यामध्ये भाऊबीजेला (Bhaubeej) विशेष महत्व आहे. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या नात्याच्या हा उत्सव यंदा 16 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. भाऊबीज हा दिवाळीतील शेवटचा दिवस आहे व दीपोत्सवाची समाप्तीदेखील याच दिवसाने होते. भाऊबीजेला बहिण आपल्या भावाला ओवाळते, त्याला टिळा लावते. यावेळी ती त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुषीसाठी प्रार्थना करते. अशा परिस्थितीत, आपल्या प्रिय बहिणीला एखादी छानसी भेट देणे हे भावाचे कर्तव्य आहे. रक्षाबंधन आणि भाऊबीज अशा दोन्ही दिवशी बहिण आपल्या भावाकडून काहीतरी गिफ्ट मिळवण्याची आशा करते.

अशावेळी यंदाच्या भाऊबीजेला आपल्या बहिणीला खुश करण्यासाठी तुम्हीही काही हटके गिफ्ट देऊ शकता. याच बाबत आम्ही काही आयडीयाज सांगणार आहोत.

कॉस्मेटिक आयटम्स-

जवळजवळ सर्वच मुलींना मेकअप करायला आवडते. अनेकदा मेकअपच्या गोष्टी महाग असल्याने मुली त्या घेणे टाळतात. अशावेळी जर आपल्या बहिणीलाही मेकअपच्या गोष्टी आवडत असतील तर यंदा आपण त्यांना भेट म्हणून कॉस्मेटिक आयटम्स देऊ शकता. या भाऊबीजेला संपूर्ण मेकअप बॉक्स आपल्या बहिणीला भेट म्हणून देता येईल. मात्र यासाठी तुम्हाला तिचा स्कीनटोन माहित असणे गरजेचे आहे.

छानसी साडी –

हे खूप कॉमन गिफ्ट आहे मात्र प्रत्येक महिला किंवा मुलीला साडी अतिशय आवडते. सध्या फार कमी प्रसंगी साडी नेसली जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीची आवड लक्षात घेऊन तिला एखादी छानसी साडी गिफ्ट करू शकता.

इलेक्ट्रॉनिक आयटम -

आजकाल माणसाचे जीवन अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम्सनी भरलेले आहे. त्यामुळे यंदाच्या भाऊबीजेला आपल्या बहिणाला काय हवे आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तिला इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट म्हणून देऊ शकता. जर आपल्या बहिणीला गाणी ऐकायला आवडत असतील तर आपण त्यांना हेडफोन, स्पीकर किंवा आयपॉडसारखी भेट देऊ शकता. यासह पॉवरबँक, हार्डडिस्क, स्मार्टवॉच, ब्लूटूथ किंवा तिला किचन मध्ये उपयोगी पडेल अशी एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू देऊ शकता.

फिटनेस आयटम्स –

आजकाल सर्वांसाठीच आपला फिटनेस महत्वाची बाब बनली आहे. प्रत्येकजण फिटनेसकडे आकर्षित असल्याचे दिसत आहे, अशा परिस्थितीत, त्यासंदर्भात एखादी वस्तू  आपणगिफ्ट आयटम देऊ शकता. यामध्ये उत्तम जिम वेअर, फिटनेस बँड, जिम एक्सेसरीज किंवा जिम मेबरशिप अशा गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता.

ओटीटी प्लॅटफॉर्म मेंबरशिप –

आजकाल अमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार अशा ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना आहे. जवळजवळ प्रत्येकजणच अशा प्लॅटफॉर्मवर फिल्म्स अथवा सिरीजचा आनंद घेत असतो. त्यामुळे तुमच्या बहिणाला याची आवड असेल तर तुम्ही यंदा तिला अशा विविध प्लॅटफॉर्मची एका वर्षाची मेंबरशिप भेट म्हणून देऊ शकता.

होम अप्लायन्स किंवा घरात उपयोगी पडणारी वस्तू –

जर आपल्या बहिणीला स्वयंपाक करण्याची आवड असेल किंवा तिचे लग्न झाले असेल, तर आपण तिला स्वयंपाकघरातील काही गोष्टी भेट म्हणून देऊ शकता. यात कॉफी मेकर, सँडविच मेकर, ब्लेंडर, डिनर सेट यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच तिला घर असल्यास घरामध्ये उपयोगी पडेल अशी एखादी वस्तूची तुम्ही तिला गिष्ट म्हणून देऊ शकता. (हेही वाचा: Bhaubeej 2020 Shubh Muhurat: यंदा भाऊबीज दिवशी कोणत्या वेळेत कराल भावांची ओवाळणी; जाणून घ्या शुभ मुहूर्त!)

दरम्यान, असे म्हटले जाते की, यमुनेने आपला भाऊ यमराजला तिच्या घरी बोलावले होते, पण वारंवार विनंती करूनही तो येऊ शकला नाही. मात्र ज्या दिवशी यमराज बहिणीकडे गेले तेव्हापासून दरवर्षी यमुनेने भावाला येण्यास सांगितले. याच दिवस भाऊबीज म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात.