Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेनिमित्त तुमच्या भावंडांना गिफ्ट देऊन खूश करण्यासाठी पहा हे बजेट फ्रेंडली पर्याय!
Bhaubeej | File Image

भाऊबीजेच्या (Bhaubeej) सणाने दिवाळीची सांगता होते. या दिवशी बहीण-भावाच्या प्रेमाचे बंध साजरे केले जाते. बहिण भावाचं औक्षण करते. त्याला गोडाधोडाचे खायला करते. त्यानंतर बहिण-भाऊ एकमेकांना भेटवस्तू देऊन दिवाळीचा सण साजरा करतात. यंदा तुम्हीही अजून तुमच्या बहीण आणि भावाला काय गिफ्ट देणार? या विचारात पडला असाल तर जाणून घ्या अगदी बजेट मध्ये पण तरीही भाऊबीजेचा दिवस स्मरणात राहील अशी कोणकोणती गिफ्ट्स तुम्ही एकमेकांना देऊन भाऊबीजेच्या सणाचा आनंद द्विगुणित करू शकाल? नक्की वाचा:  Bhaubeej 2023 Muhurat Timings: भाऊबीज मुहूर्त वेळ, सण साजरा करण्याची पद्धत, घ्या जाणून .

.बहिणींसाठी भाऊबीज गिफ्ट काय द्याल?

मेक अप सेट्स

सुंदर दिसण्यासाठी आणि सणानिमित्त घरच्या घरी देखील सेलिब्रेशन करताना आजकाल अनेकजणी बेसिक मेकअप हा करतातच मग तिला भाऊबीजेला बजेट फ्रेंडली स्वरूपात अनेक ब्रॅंडेड प्रोडक्ट्स देखील भेट म्हणून देऊ शकाल.

कपडे

साडी किंवा ड्रेस हा पर्याय गिफ्ट म्हणून कोणत्याही प्रसंगात एव्हरग्रीन पर्याय आहे. तुमच्या बहिणीच्या पसंतीनुसार, स्टाईल स्टेटमेंट नुसार तुम्ही साडी किंवा ड्रेस गिफ्ट देऊ शकाल.

दागिने

सोन्या, चांदी मध्ये दागिने सार्‍यांनाच आपल्या बहिणींना देणं शक्य नाही. पण आजकाल सोन्यापेक्षा सुरक्षेच्या आणि वैविध्यतेच्या दृष्टीने इमिटेड ज्वेलरी घालण्याकडे अनेकांचा प्राधान्यक्रम असतो. मग त्यानुसार तुम्ही दागिन्यांचे वेगवेगळे पर्याय देखील आजमवू शकता.

होम डेकोर

अने महिलांना घराची सजावट करण्याची आवड असते. तुमची बहीणही त्यापैकी एक असेल तर गिफ्ट म्हणून होम डेकोर मध्येही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये शुभ प्रसंग पाहून त्यांना तांब्या, पितळ्यामध्येही काही वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकाल

भावासाठी गिफ्ट आयडियाज

घड्याळ

अनेक मुलांसाठी घड्याळ हा विक पॉईंट आहे. आजकाल साध्या घडाळ्यांपासून अगदी फिटनेंस फ्रीक मुलांसाठी अनेक प्रकारची घड्याळं उपलब्ध आहेत.

ग्रुमिंग किट

मुलांमध्येही आता ग्रुमिंग कडे म्हणजेच चेहर्‍याची, केसांची काळजी घेण्याबाबत सजगता वाढली आहे. मुलांसाठी देखील आता विशेष ग्रुमिंग कीट्स उपलब्ध असतात.

हेड फोन

गाणी ऐकणं हा तुमच्या भावाचा छंद असेल तर विविध पर्यायामध्ये स्टाईल मध्ये हेडफोन उपलब्ध आहेत.

स्पा किंवा जिम ची मेंबरशीप

मुलांनी, पुरूषांनी देखील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. आकर्षक, पिळदार शरीरयष्टी बनवणं हे तुमच्याही भावाचं वेड असेल तर त्यांना यंदा जवळच्या जिमची मेंबरशीप द्या. किंवा त्यांचा ताण हलका करण्यासाठी स्पा व्हाऊचर्स गिफ्ट्स द्या. त्यांच्या सोयीनुसार ते जाऊन स्पा घेऊ शकतील.

गिफ्ट्ससाठी आजकाल अनेक पर्याय उपलब्ध आहेत तुम्हांला तुमच्या बजेटनुसार त्याची वेळीच स्मार्ट निवड करणं आवश्यक आहे.