Bhau Beej Gift Idea 2022: आनंदाने साजरा करा बहिण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण, भाऊबीजेला बहिणीला द्या काही हटके गिफ्ट
Special Bhaubij Gifts (Photo Credits - Twitter)

दिवाळीच्या (Diwali 2022) काळात जे पाच दिवस साजरे होतात त्यामध्ये भाऊबीजेला (Bhaubeej) विशेष महत्व आहे. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या नात्याच्या हा उत्सव यंदा 26 ऑक्टोबर नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. भाऊबीज हा दिवाळीतील शेवटचा दिवस आहे व दीपोत्सवाची समाप्तीदेखील याच दिवसाने होते. भाऊबीजेला बहिण आपल्या भावाला ओवाळते, त्याला टिळा लावते. यावेळी ती त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुषीसाठी प्रार्थना करते. अशा परिस्थितीत, आपल्या प्रिय बहिणीला एखादी छानसी भेट देणे हे भावाचे कर्तव्य आहे. रक्षाबंधन आणि भाऊबीज अशा दोन्ही दिवशी बहिण आपल्या भावाकडून काहीतरी गिफ्ट मिळवण्याची आशा करते. अशावेळी यंदाच्या भाऊबीजेला आपल्या बहिणीला खुश करण्यासाठी तुम्हीही काही हटके गिफ्ट देऊ शकता. याच बाबत आम्ही काही आयडीयाज सांगणार आहोत.

तुमची बहिण शाळेत जाणारी असो किंवा ऑफिसला जाणारी, तिला  वॉलेट लागतेच. त्यामुळे या भाऊबीजेला तिला नव्या स्टाईलचे वॉलेट किंवा पर्स गिफ्ट करा.

ladies wallet and purse

जवळजवळ सर्वच मुलींना मेकअप करायला आवडते. अनेकदा मेकअपच्या गोष्टी महाग असल्याने मुली त्या घेणे टाळतात. अशावेळी जर आपल्या बहिणीलाही मेकअपच्या गोष्टी आवडत असतील तर यंदा आपण त्यांना भेट म्हणून कॉस्मेटिक आयटम्स देऊ शकता. या भाऊबीजेला संपूर्ण मेकअप बॉक्स आपल्या बहिणीला भेट म्हणून देता येईल. मात्र यासाठी तुम्हाला तिचा स्कीनटोन माहित असणे गरजेचे आहे.

कॉस्मेटिक आयटम्स

मुलींना नेहमीच फॅशन ऍक्सेसरिज आवडतात. त्यामुळे या भाऊबीजेला आपल्या बहिणीचे सौंदर्य खुलविण्यासाठी तिला डायमंडचे ब्रेसलेट नक्कीच गिफ्ट करा.

Diamond Bracelet ( Photo Credits - pixabay.com )

आजकाल माणसाचे जीवन अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम्सनी भरलेले आहे. त्यामुळे यंदाच्या भाऊबीजेला आपल्या बहिणाला काय हवे आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तिला इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट म्हणून देऊ शकता. जर आपल्या बहिणीला गाणी ऐकायला आवडत असतील तर आपण त्यांना हेडफोन, स्पीकर किंवा आयपॉडसारखी भेट देऊ शकता. यासह पॉवरबँक, हार्डडिस्क, स्मार्टवॉच, ब्लूटूथ किंवा तिला किचन मध्ये उपयोगी पडेल अशी एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू देऊ शकता.

इलेक्ट्रॉनिक आयटम -

तुम्ही तुमच्या बहिणीसाठी काही सण उत्सवात घालण्यासाठी तुम्ही ट्रेडिशनल कुर्ती घेऊ शकता. तसेच रोज कॉलेजला किंवा ऑफिसला घालायला फॅशनेबल टॉप्सही घेऊ शकता. तुम्ही ऑनलाईन या टॉप्सची खरेदी करू शकता.

Traditional kurti and dress

फिटनेस आयटम्स –

आजकाल सर्वांसाठीच आपला फिटनेस महत्वाची बाब बनली आहे. प्रत्येकजण फिटनेसकडे आकर्षित असल्याचे दिसत आहे, अशा परिस्थितीत, त्यासंदर्भात एखादी वस्तू  आपणगिफ्ट आयटम देऊ शकता. यामध्ये उत्तम जिम वेअर, फिटनेस बँड, जिम एक्सेसरीज किंवा जिम मेबरशिप अशा गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता. (हे देखील वाचा: Happy Deepavali 2022: शुभ दीपावली म्हणत यंदाच्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Messages!)

मोबाईल पेनड्राइव्ह कनेक्टर –

युएसबी कॉडसारखी असणारी ही कॉड गिफ्ट द्यायला उत्तम पर्याय आहे. या कॉडमुळे मोबाईलमधील डेटा थेट पेनड्राइव्हमध्ये ट्रान्स्फर करता येतो. दरवेळी लॅपटॉप बरोबर नेणं जमतंच असं नव्हे. त्यामुळे अशावेळी ही भेट चांगली उपयोगी येते.