तुम्ही सासू होणार असल्यास 'या' गोष्टींची खबरदारी घ्या!
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सासु आणि सुनेमधील नाते अधिक नाजुक असल्याचे म्हटले जाते. या दोघींमध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा असला तरीही त्यांच्यामध्ये काही कारणांमुळे वाद होतात. लग्नानंतर मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातेच त्याचसोबत सासूच्या आयुष्यात ही काही नवे बदल झालेले दिसून येतात. मात्र सासूमध्ये सुनेबाबत काही गोष्टी खटकत असलेल्या त्या कधीच सोडवल्या नाहीत तर त्यांच्यामध्ये एकमेकांबाबात कालांतराने द्वेशाची भावना निर्माण होते.

खरंतर मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याचे प्रेम दुभंगल्याचे आईला वाटते. जो मुलगा आपल्या आईकडे प्रत्येक गोष्टीसाठी येत असतो तोच आता बायको आल्यानंतर तिच्याकडून सल्ले घेताना दिसतो. त्यामुळे आईच्या मनातील भावना कुठेतरी दुखावतात. एवढेच नाही कुठेतरी आईच्या मनात सुनेबाबत थोडा राग सुद्धा व्यक्त होतो. मात्र सासूने या गोष्टी समजून घेत आपला मुलगा कोणत्याही व्यक्तीला आईपेक्षा श्रेष्ठ मानत नाही. त्यामुळे त्याच्या आयुष्यात आलेली मुलगी ही त्याची बायको असून त्याच्यासोबतच पुढील आयुष्याची वाटचाल करणार असल्याचे सासूने समजून घेतले पाहिजे. त्यामुळे सासू- सुनेमध्ये काही गोष्टींबाबतचे निर्णय सामंज्यसाने सोडवायला हवेत. एकमेकांवर प्रेम केल्याने प्रेमाची भावना वाढते असे म्हटले जाते.

त्याचसोबत जेवण किंवा कोणताही अन्नपदार्थ बनवणे हे मुलींना आवडते. त्यामुळे जर तुमची सुन एखादा नवा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असल्यास तिला प्रोत्साहन द्या. एवढेच नाही तिने बनवलेला पदार्थ चवीने कसा झाला आहे त्याबाबत सुद्धा सांगा. या गोष्टींमुळे स्वयंपाक घरात नेहमीच खेळीमेळीचे वातावरण दिसून येईल.

तसेच काही वेळेस आपली सून माहेरी जात असल्याचे पाहता सासू त्रस्त होते. मात्र सासूला कळले पाहिजे की, घरात आलेली सून तिच्या परिवाराला पाठी सोडून आपल्या घरी कायमचे आयुष्य घालवण्यासाठी आलेली असते. मुलीचे आईच्या घरी जाणे हे वास्तविकच आहे कारण जसे तुमचा मुलगा तुमच्यासोबत राहतो.(हिंदू लग्नसराईच्या काळात यंदा ‘या’ राशींचे लोक अडकू शकतात विवाह बंधनात)

घरातील मुलांना जास्त कामे शिकवली जात नाहीत. मात्र तरीही तो बायकोला काम करण्यात मदत करताना दिसून येतो. अशा वेळी सासूने राग न व्यक्त करता त्यात आनंद मानला पाहिजे. त्याचसोबत काही घरांमध्ये सासू-सुनेचे नाते एकदम मैत्रीणीसारखे दिसून येते. घरात नव्याने आलेली सुन तुमचा आदर करतेच त्याचसोबत तुमच्या मुलाची सुद्धा जीवापाड काळजी घेताना दिसून येते. त्यामुळे सासूने सुद्धा आपल्या सुनेवर त्याच पद्धतीने प्रेम करणे शिकावे.