पाकिस्तानकडून झालेल्या पुलवामा (Pulwama Attack) हल्ल्याला चोख प्रत्युत्तर भारताने बालाकोट एअर स्ट्राईक (Balakot Airstrike) करुन दिले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानला चांगलीच आद्दल घडली. याच बालाकोट एअर स्ट्राईकला (Balakot Airstrike Anniversary) आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. अवघा देश या स्ट्राईकचे स्मरण करतो आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 46 जवान शहीद झाले. तो दिवस होता 14 फेब्रुवारी 2019. या हल्ल्याने भारतीय नागरिक हादरुन गेले. त्यांच्या मनामध्ये बदल्याची आग होती. केंद्र सरकारवर भारतीय जनतेचा दबाव वाढत होता. अखेर केंद्र सरकारने महत्त्वाचा नर्णय घेतला. पुलवामा हल्ल्याला बालकोट एअर स्ट्राईकने प्रत्युत्तर द्यायचे.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रयत्नात, भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या बालाकोट भागात या भागात असलेल्या दहशतवादी तळांवर बॉम्बहल्ला केला. भारत सरकारने 27 फेब्रुवारी रोजी बालाकोट हवाई हल्ल्याची पुष्टी केली आणि म्हटले की भारतीय लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई बॉम्बहल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट भागात तळ ठोकून मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले. (हेही वाचा, Abhinandan Vardhaman Promoted: बालाकोट एअर स्ट्राईकचा हिरो 'अभिनंदन' वर्धमानला बढती, ग्रुप कॅप्टन बनवले)
काय आहे पुलवामा हल्ला?
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा भागात पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यामुळे या हल्ल्याला पुलवामा हल्ला म्हणतात. या हल्ल्यात 46 CRFP जवान शहीद झाले. पुलवामा हल्ला 14 फेब्रुवारी 2019 रोजी झाला होता. हा हल्ला एका आत्मघातकी बॉम्बरने केला होता. ज्याची जबाबादारी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती.
बालाकोट एअर स्ट्राईक करुन प्रत्युत्तर
पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून आणि शहीद झालेल्या CRPF जवानांना श्रद्धांजली म्हणून, भारत सरकारने पाकिस्तानी दहशतवाद्यांवर बालाकोट हवाई हल्ल्याची योजना आखली. त्यानुसार 26 फेब्रुवारीच्या पहाटे, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमधील विवादित प्रदेशात सीमा ओलांडली आणि पाकिस्तानच्या बालाकोटमधील एका छोट्या गावात बॉम्ब टाकले आणि त्या भागात उभारलेल्या कथित दहशतवादी तळांवर हल्ला केला. ज्यात कथितपणे या भागातील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.