Bacchu Kadu | (Photo Credit: Facebook)

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi), महाराष्ट्राच्या (Maharashtra) लाडक्या विठूरायाचा उत्सव. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या पांढूरंगाला भेटायला पंढरपुरात येतात. एकादशीच्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेचा मान मिळतो. विठ्ठल रुख्मिणीची आषाढी एकादशीची महापुजा नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पार पडली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. म्हणून त्यांना आज या विशेष महापूजेचा मान मिळाला.

 

एकनाथ शिंदेनी केलेल्या या बंडादरम्यान चर्चेत आलेलं नाव म्हणजे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu). सर्वसामान्यांचा नेता म्हणून परिचित असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी आज विशेष पध्दतीने आषाढी एकादशी साजरी केली आहे. आज आषाढी एकादशी निमीत्त बच्चू कडूंनी मुंबईतील (Mumbai) किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन वृध्दाश्रमाला भेट दिली. तसेच खुद्द बच्चू कडूंनी वृध्दांचे पाय धुवत त्यांना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. बच्चू कडूंनी राबवलेला हा उपक्रम अनोखा आहे. संबंधीत माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिलेली आहे.

 

तसेच महाराष्ट्रातील इतर बड्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या कुटुंबासह आपल्या लाडक्या विठू रायाची पूजा केलेली आहे. विठ्ठल महाराष्ट्राचं दैवत असुन आषाढी एकादशी हा राज्याचा सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. राजकारण्यापासून सेलिब्रिटीस पर्यत आज सगळेच विठू चरणी नतमस्तक होतात.