Armed Forces Flag Day 2020: भारतीय  जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, HD Images, Wallpapers
Armed Forces Flag Day Messages (Photo Credits: File Image)

भारतामध्ये प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर हा दिवस 'सशस्त्र सेना झेंडा दिवस' म्हणजेच भारतीय लष्कर ध्वज दिन (Indian Armed Forces Flag Day) म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारला शहीदांच्या परिवारांच्या हितासाठी, स्वाभिमानालादेखील सन्मानपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचं लक्षात आल्यानंतर या दिवसाचं महत्त्व वाढलं. समितीच्या अनुसार, हा दिवस सैनिकांप्रती सन्मान प्रदर्शित करण्यासाठी आहे. 23 ऑगस्ट 1947 पासून केंद्र सरकारने 7 डिसेंबर हा दिवस 'सशस्त्र सेना झेंडा दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. मग आजच्या या दिवसाचं औचित्य साधून देशसेवा करणार्‍या प्रत्येक जवानाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आज सोशल मीडीयात WhatsApp, Facebook, Twitter  द्वारा नक्की शेअर करा Armed Forces Flag DayHD Images, Wallpapers.

Indian Armed Forces Flag Day साजरा करण्यामागे मुख्य उद्देश असतो तो म्हणजे युद्धाच्या वेळेस ज्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांचं पुनर्वसन करणं. सोबतच पूर्वाश्रमींच्या सैनिकांची काळजी घेणं, त्यांच्या परिवाराची जबाबदारी घेणं. तसेच कॅन्सर, हृद्यविकास, जॉईंट रिप्लेसमेंट किंवा अन्य गंभीर आणि खर्चिक आजारपणात त्यांची साथ देण्यासाठी आर्थिक हातभार लावला जातो.

भारतीय लष्कर ध्वज दिन शुभेच्छा 

Armed Forces Flag Day Messages (Photo Credits: File Image)
Armed Forces Flag Day Messages (Photo Credits: File Image)
Armed Forces Flag Day Messages (Photo Credits: File Image)
Armed Forces Flag Day Messages (Photo Credits: File Image)

मिनिस्ट्री ऑफ़ डिफेंस कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी अंदाजे 60 हजार सैन्य दलातील जवान निवृत्त होतात. आर्म्ड फोर्स ही चिरतरूण ठेवण्यासाठी ही निवृत्ती केली जाते. अंदाजे 35-40 वयोगटातील जवान निवृत्त होत असतात. पण हे फिजिकली फीट आणि तुलनेने बाकी काम करण्यासाठी अजूनही तरूण आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांच्या परिवाराला साथ देणं ही भारतीयांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे.