Anganewadi Jatra 2021: महाराष्ट्रातील सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणांहून भराडी देवीच्या जत्रेसाठी आंगणेवाडी येथे मोठ्या प्रमाणात येतात. तर आंगणेवाडीची जत्रा ही संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून त्यावेळी मोठी जत्रा सुद्धा भरवली जाते. पण यंदा आंगणेवाडीच्या जत्रेच्या उत्सवाचा आनंद भाविकांना घेता येणार नाही आहे. कारण भाविकांसाठी ही जत्रा रद्द करण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.(शिर्डी: साईबाबांच्या चरणी देणगी स्वरूप महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीनं देण्यात आली 'Thar')
आंगणेवाडीची यंदा जत्रा 6 मार्च रोजी असणार आहे. परंतु भाविकांना यावेळी जत्रेला उपस्थिती लावण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच उदय सामंत यांनी सुद्धा भाविकांना आंगणेवाडीच्या जत्रेच्या उत्सवासाठी येऊ नये असे आवाहन केले आहे. त्याचसोबत माझी जत्रा माझी जबाबदारी असे अभियान जत्रेसाठी राबवणार असल्याचे ही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.देवीची जत्रा रद्द केली असली तरीही दोन दिवस धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमासंदर्भात उदय सामंतर यांची मंडळासोबत बैठक सुद्धा पार पडली आहे.(Pandharpur Maghi Yatra 2021: महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविल्यामुळे पंढरपूर माघी यात्रेवर सावट)
दरम्यान, यंदा आंगणेवाडीची जत्रा अत्यंत साधेपणाने साजरी केली जाणार आहे. याआधी भराडीदेवीच्या जत्रेचे आयोजन डिसेंबर महिन्यात पार पडणार होती. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता ती रद्द केली होती. पण अद्याप सुद्धा कोरोनाची स्थिती कायम असली तरीही 6 मार्चला जत्रा पार पडणार आहे. त्याचसोबत भाविकांनी सुद्धा निर्णयाला सहकार्य करावे असे आंगणे कुटुंबियांनी केले आहे.