Pandharpur Wari (Photo Credits : Commons.Wikimedia)

गेल्या वर्षभरापासून जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस यशस्वी लस बनविण्यासाठी तज्ज्ञांना यश आले. भारतातही कोरोनावर यशस्वी लस आली असून देशभरात लसीकरण देखील सुरु झाले. मात्र हे लसीकरण टप्प्याटप्याने सुरु असल्या कारणाने कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला असे आपण म्हणू शकत नाही. म्हणूनच 28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे यंदा फेब्रुवारीमध्ये होणारा पंढरपूर माघी यात्रा (Pandharpur Maghi Yatra) करायची की नाही याबाबत मंदिर समितीच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीला या मंदिर समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे.

वारकरी संप्रदायाची महत्त्वाची अशी समजली जाणारी ही माघी यात्रा यंदा 23 फेब्रुवारीला होत आहे. मात्र कोरोनाच्या नियमानुसार यात्रेमध्ये जत्रा भरण्यास परवानगी नसल्याने या यात्रेवरही कोरोनाचे सावट घोंगावत आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून यावर काही मध्य उपाय काढता येतो हे पाहण्यासाठी आणि यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीला मंदिर समितीचे सदस्य महत्त्वाची बैठक घेणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे असंख्या वारक-यांना पंढरपूरच्या वारीला मुकावे लागले. त्यामुळे यंदा नवीन वर्षाच्या सुरुवात तरी विठुरायाच्या दर्शनाने व्हावी अशी इच्छा वारकरी संप्रदायातील लोक व्यक्त करत आहेत.हेदेखील वाचा- Lockdown in Maharashtra: राज्यात 28 फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन कायम

मात्र कोरोनाच्या संकटामुळे नवीन वर्षातील राज्यात होणाऱ्या अनेक यात्रा शासनाने रद्द केल्याने माघीबाबतही शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी सांगत आहेत . सध्याच्या कोरोना संकट काळात अजून लसीकरण सर्वसामान्यांना देण्यास सुरुवात झाली नसल्याने वारकरी संप्रदायाची माघी यात्राही संचारबंदीच्या सावटाखाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) कायम राहणार आहे. दरम्यान, मिशन बिगेन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. त्याचप्रमाणे यापूर्वी लागू करण्यात आलेले नियम 28 फेब्रुवारी पर्यंत लागू राहतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.