
गणेश चतुर्थी पासून सुरू झालेल्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी होते. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर दिवशी साजरी होणार आहे. या दिवशी घरगुती 10 दिवसांच्या बाप्पांचे आणि सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे विसर्जन केले जाते. गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीचा दिवस हा महत्त्वाचा असतो. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत मराठमोळ्या शुभेच्छा, Greetings, Wishes, HD Images शेअर करून ही शुभेच्छापत्रं शेअर करा.
अनंत चतुर्दशीला लहान-मोठ्या मंडळातील बाप्पाच्या मूर्त्या विसर्जनाला बाहेर पडतात. त्यामुळे वातावरण भारावून टाकणारं असलं तरीही अनेकांसाठी डोळ्यात पाणी आणणारं देखील असतं. बाप्पाच्या दहा दिवसांच्या सेवेनंतर त्याचं विसर्जन करणं हा क्षण अनेकांसाठी भावूक असतो. पण पुढल्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशी दिवशी का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या त्यामागची दंतकथा.
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

आली अनंत चतुर्दशी मनात हुरहूर !
देव बाप्पा आपल्या गावी जातोय दाटले दुःख सर्वदूर !
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

रिकामं झालं घर, रिता झाला मखर
पुढल्या वर्षी लवकर येण्यास
निघाला लंबोदर
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

निरोप देतो आता
देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा
क्षमा असावी!
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाच्या निरोपालाही घराघरात मोदक बनवण्याची रीत आहे. अनंत म्हणजे भगवान विष्णूची देखील या दिवशी पूजा केली जाते.