Ganpati Visarjan Quotes in Marathi: महाराष्ट्रात 22 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सांगता यंदा 1 सप्टेंबर दिवशी अनंत चतुर्दशीला होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी बाप्पाच्या विसर्जनाची धामधूम नसेल मात्र बाप्पाच्या विसर्जनाचा मंगलमय दिवस आनंदाने, जल्लोषाने घरच्या घरी साजरा करा. बाप्पाच्या आशिर्वादाने तुमच्या सोबतच तुमचे नातेवाईक, प्रियजन, मित्र मंडळी यांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देत बाप्पाला निरोप देताना ' गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या' या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये मराठी संदेश, बाप्पा स्टेटस, मराठमोळी शुभेच्छापत्र (Marathi Greetings), मेसेजेस (Messages) च्या माध्यमातून या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका. यंदा अनेकांनी ऑनलाईन दर्शन घेऊनच बाप्पाला घरातून नमस्कार केला आहे. मग बाप्पाच्या निरोपाचा दिवसही आज फेसबूक मेसेंजर(Facebook Messenger), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) शुभेच्छा देत मोठ्या उत्साहाने साजरा करा.
महाराष्ट्रात अनंत चतुर्दशीचा दिवस हा 10 दिवसांच्या गणपाती बाप्पांच्या निरोपाचा दिवस म्हणून साजरा केला जात असला तरीही उर्वरित भारतामध्ये अनंत चतुर्दशीचे खास व्रत असते. हिंदू पुराणातील कथेनुसार, भगवान विष्णूच्या अनंत रूपाची आराधना केली जाते. 14 वर्ष हे व्रत केल्याने विष्णू लोक मिळतो असे म्हटले जाते. मात्र महाराष्ट्रामध्ये अनंत चतुर्दशी ही बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या धामधूमीत साजरा करण्याची पद्धत आहे.
अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा
अनंत चतुर्दशी दिवशी महाराष्ट्रामध्ये घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. समुद्र, तलाव, नदी यांच्यासोबतच यंदा कृत्रिम तलाव आणि घराघरामध्ये ट्ब, बादलीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी अनंत चतुर्दशीला तासनतास चालणार्या मिरवणूका, ढोल -ताशांचा थाट नसेल. पण बाप्पाला यंदा जाता-जाता सार्या मनुष्य जातीला कोरोनाच्या विळख्यातून मुक्त करत सुख, समाधान आणि निरोगी आरोग्य देवो! अशी प्रार्थना करूया आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत निरोप देऊया!