File Photo

Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेत(Amarnath Yatra)सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्याने दाखल होत आहेत. 6,461 यात्रेकरुंची आणखी एक तुकडी सोमवारी काश्मीरला (Jammu and Kashmir)रवाना झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांत 28,534 यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रा केली. 6,461 यात्र्यांची आणखी एक तुकडी आज जम्मूतील भगवती नगर यात्री निवास येथून दोन एस्कॉर्टेड ताफ्यांमध्ये खोऱ्यासाठी रवाना झाली. त्यापैकी 2321 आज पहाटे 3.15 वाजता उत्तर काश्मीर बालटाल बेस कॅम्पसाठी 118 वाहनांच्या ताफ्यात रवाना झाले. 147 वाहनांच्या दुसऱ्या एस्कॉर्टेड ताफ्याने 4,140 यात्रींना पहाटे 4.10 वाजता दक्षिण काश्मीर नुनवान (पहलगाम) तळापर्यंत नेले,” अधिकाऱ्यांनी सांगितले.

यात्री यात्रा करण्यासाठी 48 किमी लांबीचा पारंपारिक पहलगाम-गुहा तीर्थ मार्ग किंवा लहान 14 किमी लांबीचा बालटाल-गुहा तीर्थ मार्ग वापरतात. पहलगाम मार्ग वापरणाऱ्यांना गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी चार दिवस लागतात तर बालटाल मार्गाने जाणारे ‘दर्शन’ करून त्याच दिवशी बेस कॅम्पवर परत येतात.

समुद्रसपाटीपासून 3888 मीटर उंचीवर असलेल्या या गुहेत बर्फाच्या स्टॅलेग्माइटची रचना आहे जी कालांतराणे क्षीण होते. भक्तांचा असा विश्वास आहे की बर्फ स्टॅलेग्माइट रचना भगवान शिवाच्या पौराणिक शक्तींचे प्रतीक आहे. यंदाच्या यात्रेत 7000 हून अधिक ‘सेवादार’ (स्वयंसेवक) यात्रेकरूंची सेवा करत आहेत. यात्रेकरूंच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, रेल्वेने 3 जुलैपासून जादा गाड्या जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गांवर यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे.