![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/4-अक्षय्य-तृतीयाच्या-हार्दिक-शुभेच्छा-380x214.jpg)
Akshaya Tritiya 2023 HD Images: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2023) सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आला आहे. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होईल. पुजेचा शुभ मुहूर्त हा 22 एप्रिल रोजी 7 वाजुन 48 मिनिटांपासुन सुरू होऊन दुपारी 12 वाजुन 20 मिनिटांपर्यत असणार आहे. अक्षय म्हणजे ‘जे कधीही संपत नाही’, म्हणूनच असे म्हटले जाते की, अक्षय्य तृतीयेला केलेल्या कार्माचेही कधी न संपणारे फळ मिळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. म्हणून ही तिथी अक्षय्य मानली गेली आहे.
या दिवशी केलेले यज्ञ, होम हवन, जप तप, दान, पुण्य असे कुठलेही कर्म आपणास अक्षय फळप्राप्ती देणारे ठरते. हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही ओळखला जातो कारण हा दिवस परशुरामाच्या व्यक्तीमध्ये विष्णूचे सहावे अवतार दर्शवितो. या दिवशी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशी आणखी एक मान्यता आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशीच महर्षी व्यास यांनी महाभारत लिहायला आरंभ देखील केला होता.
तर आजच्या या शुभमुहूर्तावर खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/1-अक्षय्य-तृतीयाच्या-हार्दिक-शुभेच्छा.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/2-अक्षय्य-तृतीयेच्या-मनापासून-शुभेच्छा.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/3-अक्षय्य-तृतीयाच्या-खूप-खूप-शुभेच्छा.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/4-अक्षय्य-तृतीयाच्या-हार्दिक-शुभेच्छा.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/5-अक्षय्य-तृतीयेच्या-मंगलमय-शुभेच्छा.jpg)
दरम्यान, सर्व शुभ कार्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस विवाहासाठी अत्यंत अनुकूल आहे. या व्यतिरिक्त उपनयन संस्कार, वास्तू पूजन, सर्व शुभ कार्ये, नवीन व्यवसायाची सुरुवात यासाठीही आजचा दिवस लाभकारक आहे. या दिवशी सोने खरेदी केले जाते, जेणेकरून आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहो. (हेही वाचा: Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' खास टिप्स; अन्यथा होऊ शकते तुमची फसवणूक)
आजच्या दिवशी दानालाही विशेष महत्व आहे. या दिवशी तूप, साखर, तृणधान्ये, फळे, भाजीपाला, चिंच, वस्त्र, सोने, चांदी, पाण्याचे मडके आणि इतर वस्तूंचे दान केले जाते.