![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/05/Untitled-design-54-380x214.jpg)
Akshaya Tritiya 2022 Auspicious Time To Buy Gold: हिंदू पौराणिक कथेनुसार अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा दिवस सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा अक्षय्य तृतीया 3 मे, मंगळवारी साजरी होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते. नवीन काम सुरू करण्यासाठी, सोने आणि मालमत्ता यासारख्या महागड्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. लोक आखा तीजच्या दिवशी गृहप्रवेश पूजा, प्रतिबद्धता आणि विवाह समारंभ देखील आयोजित करतात.
सोन्याचे दागिने आणि सोन्याची नाणी खरेदी करणे ही अक्षय्य तृतीयेची सर्वात लोकप्रिय परंपरा आहे. या दिवशी लोक सामान्यतः शुभ मुहूर्तावरचं सोने खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी तिथी आणि शुभ मुहूर्त (तारीख आणि वेळ) खाली दिला आहे. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेला सोन्याचे नाणे खरेदी करण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होईल मोठं नुकसान)
अक्षय्य तृतीया 2022 सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त - (Akshaya Tritiya 2022 Shubh Muhurat For Buying Gold)
अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्म आणि लोकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात अनुकूल दिवसांपैकी एक मानला जातो. लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त कधी आहे? द्रीकपंचांगनुसार, अक्षय्य तृतीया तिथी 2 मे 2022 रोजी 29:18+ पासून सुरू होईल. म्हणजेचं ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये पुढील दिवशी सकाळी 5:08 वाजता आणि 4 मे 2022 रोजी सकाळी 07:32 वाजता समाप्त होईल. सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त खाली देण्यात आला आहे.
- अक्षय तृतीया सोने खरेदीची वेळ 2 मे - 05:18 AM ते 05:39 AM, 3 मे. आणि कालावधी - 00 तास 21 मिनिटे
- अक्षय्य तृतीया सोने खरेदीची वेळ 3 मे - 05:39 AM ते 05:38 AM, 4 मे आणि कालावधी आहे - 23 तास 59 मिनिटे
- सकाळचा मुहूर्त (Chara, Labha, Amrita) - सकाळी 08:59 ते दुपारी 1:58
- दुपारचा मुहूर्त (Shubha) - दुपारी 03:38 ते संध्याकाळी 05:18
- संध्याकाळचा मुहूर्त (Labha) - रात्री 08:18 ते रात्री 09:38
- रात्रीचा मुहूर्त (Shubha, Amrita, Chara) - रात्री 10:58 ते दुपारी 2:58, 4 मे
हिंदू धर्मग्रंथांनुसार अक्षय्य तृतीया ही त्रेतायुगाची सुरुवात आहे आणि ती भगवान परशुरामांची जयंती देखील मानली जाते. या दिवशी भक्त भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. लोक मंदिरांना भेट देतात आणि पूजेत सहभागी होतात. अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र प्रसंगांपैकी एक आहे.