
Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi: मराठा साम्राज्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 मध्ये अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे झाला. आज त्यांची 296 वी जयंती आहे. अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या कन्या. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्या होळकर घराण्यात सून म्हणून आल्या आणि पुढे स्वकतृत्वाने कुशल, शुरवीर, तत्त्वज्ञानी राणी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. अहिल्याबाईंमध्ये अद्भूत साहस आणि विलक्षण प्रतिभा असल्यामुळे त्या राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असतं. तसंच आपले पती खंडेराव यांना सतत प्रोत्साहित करत असतं. खंडेराव होळकर यांचे कुम्हेरच्या लढाईत निधन झाल्यानंतर सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जावून दिले नाही. याउलट त्यांनी सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर माळवा प्रांताचा कारभार त्या स्वत: सांभाळू लागल्या. (Ahilyabai Holkar Jayanti 2021 Messages In Marathi: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारी Greetings, HD Images, Photos!)
कोविड-19 संकटामुळे त्यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करता येणार नसली तरी सोशल मीडिया माध्यमातून शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांना प्रणाम करु शकता. त्याकरीता तुमच्यासाठी खास मराठी HD Images, Wallpapers, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर त्यांना विनम्र अभिवादन करा.
अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छापत्रं!






विशेष म्हणजे अहिल्याबाईंना भारतभर अनेक मंदिरं बांधळी. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक यांसारख्या तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधल्या. प्रजेच्या रक्षणासाठी सतत तत्पर असलेल्या अहिल्याबाई अत्यंत न्यायप्रिय होत्या. उचित न्यायदानासाठी त्यांना ओळखले जात होते. तसंच दानशूरता, उदारता, दया, करुण आणि परोपकार हे त्यांचे अजून काही खास गुण. अशा महान राणी अहिल्यादेवींना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!