
Ahilyabai Holkar Jayanti 2019: अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची आज 294 जयंती महराष्ट्रासह देशभरात साजरी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात त्यांचा जन्म झाला. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा मल्हारराव होळकर यांच्या घरी सून म्हणून प्रवेश झाला. पतीच्या निधनानंतर त्यांनी कारभार सांभाळायला सुरूवात केली. न्यायदानासाठी अहिल्याबाई होळकर यांची विशेष ओळख आहे. भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’ म्हणून इंग्रजी लेखकांनी अहिल्याबाईंचा उल्लेख केला आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी
- अहिल्याबाई होळकर या पुण्यश्लोकी म्हणून ओळखल्या जातात.
- बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, अशी अहिल्यादेवी होळकर यांची धारणा होती.
- अहिल्यादेवींनी जंगलतोडीवर बंदी आणली. प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे यानुसार झाडे लावून घेतली. जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला.
- अहिल्यादेवींनी त्यांच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात केली. अहिल्यादेवींनी हुंडाविरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या, घेणार्या व मध्यस्थी करणाऱ्यांना दंड ठोठावला.
- अहिल्यादेवींच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी सती न जाण्याचा निर्णय त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी घेतला.
- अहिल्यादेवी या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात.
70 व्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले. अनेकांनी त्यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंना संताचा दर्जा दिला.