नववर्षाच्या (New Year Celebration) स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु झाली आहे. यंदा दरवर्षीप्रमाणे एकत्रितरित्या येऊन मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा करता येणार नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण देशभरात थर्टी फर्स्टच्या (31st Celebration) सेलिब्रेशनवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र घरच्या घरी आपल्या कुटूंबियांसोबत वा मित्रपरिवारासोबत तुम्ही थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करु शकता. यासाठी काही गेम्स वा छान जेवणाचा बेत करून तुम्ही हे सेलिब्रेशन करु शकता. त्यामुळे भले घराबाहेर पडून हा दिवस साजरा करता येत नसला तरीही हताश न होता तुम्ही घरच्या घरी देखील याचे छान सेलिब्रेशन करु शकता.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काय काय गोष्टी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला घरात राहून नववर्षाचे जंगी स्वागत करता येईल.
1. हौजी गेम
हौजी हा गेम तुम्ही जास्त लोक असाल तरी अगदी मजेशीररित्या खेळू शकता. शक्य असल्यास तुम्ही अगदी 1-2 रुपयापासून पैसे लावून देखील पैसे कमवून या गेमचा आनंद घेऊ शकता.हेदेखील वाचा- New Year Resolution 2021: नवीन वर्षाकरिता गृहिणी, बच्चे कंपनीसाठी नवीन वर्षासाठी काही हटके संकल्प
2. घरात नृत्याचा कार्यक्रम
घरात डान्स फ्लोअर तयार करुन त्यावर डिस्को प्रमाणे लायटिंग करुन देखील तुम्ही अगदी छोट्या आवाजात गाणी लावून त्यावर थिरकू शकता. (शेजारी लोक राहत असतील तर त्यांना त्रास होऊ न देता)
3. जेवणाचा छान बेत करा.
काहींसाठी थर्टी फर्स्ट म्हणजे मांसाहारी जेवणावर छान ताव मारणे असा आहे. म्हणून तुम्ही छान जेवणाचा बेत आखून मांसाहारी आणि शाकाहारी असे दोन्ही पद्धतीने जेवण बनवू शकता.
4. पत्ते, मजेशीर खेळ खेळू शकता.
पत्ते खेळणे मोठ्या लोकांचा आवडीचा गेम आहे. त्यामुळे तुम्ही पत्ते खेळू शकता. त्याचबरोबर महिलांना देखील किटी पार्टीप्रमाणे घरी खेळता येणारे इनडोअर गेम्स खेळू शकता.
5. अंताक्षरी/दम शे राज
गाण्यांच्या भेंड्या म्हणजेच अंताक्षरी चा खेळ खेळू शकता. त्याचबरोबर गाण्यांचा कंटाळा आला असेल तर दमशेराज हा गेम देखील खेळू शकता.
कोरोना स्थितीचे भान राखून नागरिकांनी देखील सरकारला साथ देत सरकारच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे आणि घरच्या घरी अगदी साधेपणाने पण सर्वांना आठवणीत राहिल असे 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन केले पाहिजे.